रासे फाटा ते कडाचीवाडी बाह्य वळण रस्ता त्वरित मार्गी लावणार – PMRD मुख्य अभियंता अशोक भालकर
मुख्य चाकण चौक येथे होत असलेली वहातुक कोंडी टाळण्यासाठी साठी रासे फाटा ते कडाचीवाडी मेदनकरवाडी नाणेकरवाडी म्हाळुंगे बाह्य वळण रस्ता त्वरित मार्गी लावणार. पी.एम.आर.डी.मुख्य अभियंता श्री अशोक भालकर. आज पी.एम.आर.डी. पोलिस प्रशासन, पंचायत समिती.व शेतकरी कुणबी मराठा संघ अध्यक्ष अप्पासाहेब कड व ग्रामस्थ यांच्या बरोबर संयुक्त स्थळ पहानी करतांना ते बोलत होते.मेदनकरवाडी ,(रा.मार्ग.60) बंगला वस्ती चौक ते रासे फाटा डी.पी.36मी.व लांबी 1.8किमी हा रस्ता प्राधान्याने केला जाईल व बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल या प्रसंगी श्री भोईटे साहेब ऐ.सी.पी..श्री विजय कांडगावे.साहेब कार्यकारी अभियंता श्री जितेन्द्र पगार साहेब क्षेत्रीय अभियंता श्री आजय जोशी साहेब गट विकास अधिकारी खेड. पी आय.डामजे साहेब व चौरे साहेब विस्तार अधिकारी श्री सुखदेव साळुंखे ग्रामविकास अधिकारी छाय इरनक,निलीमा जाधव,सुदाम कड.सरपंच श्री.संदेश साळवे, श्री महादेव बचुटे श्री महेन्द्र मेदनकर धनंजय मेदनकर संकेत मेदनकर श्री शामराव कड श्री किरण कड व बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
