फर्ग्युसन महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
दिवसाचे औचित्य साधून फर्ग्युसन महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे (एनसीसी) विजय रन मॅरेथॉन, पोस्टर प्रदर्शन स्पर्धा, आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.फर्ग्युसन महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
आज पहाटे पाच वाजता ‘विजय रन’ मॅरेथॉनने या दिवसाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सेनेच्या आधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. यात भारतीय सेनेद्वारे वापरली जाणारी अत्याधुनिक शस्त्रे विद्यार्थ्यांना जवळून पाहता आली. शहरातील शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट दिली.
पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजित केली होती. यात विद्यार्थ्यांना कारगिल युद्धाशी संबंधित चित्रे आणि संदेशांद्वारे आपली सर्जनशीलता व्यक्त करण्याची संधी मिळाली.
परमवीरचक्र सुभेदार मेजर कॅप्टन संजय कुमार आणि मेजर जनरल (निवृत्त) विक्रम सिंग राठोड यांची व्याख्याने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्याम मुडे यांनी स्वागत केले.
पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. ते स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्या सुरक्षेसाठी सैनिक सीमेवर कार्यरत आहेत. ते स्वतःसाठी नाही तर आपल्या आणि भावी पिढीच्या सुरक्षेसाठी काम करतात. आपणही प्रत्येक काम स्वार्थासाठी नाही तर हा देश माझा आहे या भावनेने केले पाहिजे असे मत संजय कुमार यांनी व्यक्त केले.
‘गणवेशापलीकडची राष्ट्रसेवा : आजच्या तरुणाईची भूमिका’ या विषयावर राठोड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्राचार्य मुडे म्हणाले, “कारगिल युद्धातील हुताम्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
फर्ग्युसन महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे सहयोगी एनसीसी अधिकारी नंदकुमार बोराडे आणि सुनील होवाळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.फर्ग्युसन महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
