प्रभाग क्रमांक २४ मध्ये आयोजित अनुसूचित जाती आरक्षण बचाव सभा यशस्वी
मंगळवार पेठ अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समिती तसेच शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचाराचे सर्व पक्ष, संघटना, कार्यकर्ते व आंबेडकरी समाज अनुयायी यांच्या वतीने आयोजित आरक्षण बचाव निर्धार सभा पार पडली.प्रभाग क्रमांक २४ मध्ये आयोजित अनुसूचित जाती आरक्षण बचाव सभा यशस्वी
या सभेत मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहून “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
मंगळवार पेठ व परिसर (तथागत बुद्ध नगर, जुने भीम नगर, श्रमिक नगर, पीएमसी कॉलनी, कसबा पेठ, ससून कोटर्स, जुना बाजार, भराव व वस्ती भाग) येथे अनुसूचित जातींची घनदाट लोकसंख्या असूनदेखील, स्वार्थासाठी एका विशिष्ट पक्षाच्या नेत्याला निवडून आणण्यासाठी पारंपरिक अनुसूचित जातीचे आरक्षण काढून टाकण्याचा पूर्वनियोजित डाव रचला गेला आहे.
परिणामी पुढील १५ वर्षे समाजाला आरक्षणापासून वंचित राहावे लागणार असून हा मोठा सामाजिक अन्याय असल्याचे मत मान्यवरांनी मांडले.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने प्रभाग क्रमांक २४ (कमला नेहरू हॉस्पिटल, रास्ता पेठ) ची संभाव्य प्रभाग रचना जाहीर झाली असून सदरील प्रभागातील अनुसूचित जातीचे (एस.सी.) आरक्षण तोडमोड करून अन्याय झाल्याचे निदर्शनास आले आहे.
सभेत मान्यवरांनी सांगितले की,
१९३२ साली झालेल्या पुणे कराराला २४ सप्टेंबर २०२५ रोजी ९३ वर्षे पूर्ण होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय व अनुसूचित जाती समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी प्राणांतिक संघर्ष केला होता.
आज पुन्हा त्या इतिहासाची पुनरावृत्ती होत असून आपल्या समाजाच्या भविष्याचे प्रतिनिधित्व व हक्काचे आरक्षण वाचवण्यासाठी आपण एकत्र यायला हवे.
या पार्श्वभूमीवर आरक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून हा मोर्चा आयोजित करण्यात आला.
