सुमीत एसएसजी – अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या युअरलाईफ आणि मेडस्कील्ससोबत धोरणात्मक भागीदारी
राज्यात सक्षम आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे बळकटीकरण व्हावे तसेच पायाभूत वैद्यकीय सुविधांचे जाळे वाढवण्यासाठी सुमीत एसएसजी ने अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या युअरलाईफ आणि अपोलो मेडिस्कील्ससोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. ही भागीदारी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस १०८) या प्रकल्पांतर्गत जाहीर करण्यात आली आहे.
या भागीदारीमुळे राज्यभरातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांची क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. वैद्यकीय कर्मचा-यांची योग्य प्रतिसाद देणारी यंत्रणा, कार्यक्षमता, गतीमानता आणि रुग्णकेंद्रित सेवा सुनिश्चित करणे या भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
मुख्य उपक्रम:
- सुमीत एसएसजी राज्यभरातील विविध ठिकाणी हजारांहून अधिक रुग्णवाहिका उपलब्ध करेल, ज्यात प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि चालकांचा समावेश असेल.
- अपोलो युअरलाईफद्वारे २,३००+ डॉक्टर नियुक्त केले जातील.
- अपोलो मेडिस्कील्स ४,५००+ वैद्यकीय कर्मचा-यांना विशेष प्रशिक्षण देईल, ज्यात रुग्णकेंद्रित उपचार, आपत्कालीन अपघात व्यवस्थापन, जीवनरक्षक प्रणाली आणि तातडीच्या प्रतिसाद प्रोटोकॉलचा समावेश असेल.
एमईएमएस १०८ हा जागतिक पातळीवरील आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा उभारण्यासाठी सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. राज्यातील प्रत्येक शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना विनामूल्य आणि तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
अपोलो मेडिस्कील्सची भूमिका:
- आपत्कालीन वैद्यकीय कर्मचा-यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रुग्ण सुरक्षा मानकांनुसार प्रशिक्षण देणे.
- लेखापरीक्षण, चर्चा आणि संवाद कौशल्यांचे प्रशिक्षण.
- गंभीर परिस्थितीतही अचूक आणि सहानुभूतीपूर्ण रुग्णसेवा सुनिश्चित करणे.
सुमीत एसएसजीचे CEO सुधांशु करंदीकर म्हणाले:
“सुमीत एसएसजीच्या कार्यक्षमतेमुळे आणि अपोलोच्या विश्वसनीय आरोग्यसेवा प्रणालीमुळे राज्यात आपत्कालीन सेवेचे नवे मापदंड निर्माण होतील. राज्यातील ही नवी आरोग्यसेवा यंत्रणा देशभरातील आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी आदर्श ठरेल.”
अपोलो युअरलाईफचे CEO टी. करुणाकर म्हणाले:
“अपोलो हॉस्पिटल्सची ही भागीदारी भारतातील आरोग्य सेवा यंत्रणा सक्षम करण्याच्या आमच्या अढळ बांधिलकीची पुष्टी करते. प्रत्येक नागरिकाला तत्काळ, विश्वासार्ह आणि उच्च दर्ज्याच्या वैद्यकीय मदतीची खात्री देणे हे आमचे ध्येय आहे.”
अपोलो मेडिस्कील्सचे CEO डॉ. श्रीनिवास राव पुलिजाला म्हणाले:
“ही भागीदारी रुग्णांना त्वरित वैद्यकीय उपचार, उत्कृष्ट क्लिनिकल सेवा आणि समाजकेंद्रित आरोग्य सेवा देत लाखोंना नवे जीवनदान करण्याच्या आमच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”
ही भागीदारी राज्यात सक्षम, तत्काळ प्रतिसाद देणारी आणि उच्च दर्जाची आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा उभारण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सहकार्यातून राज्यभरात आपत्कालीन आरोग्यसेवा वेळोवेळी बळकट होईल आणि वैद्यकीय प्रतिसादाचे नवे मापदंड तयार होतील.
