Daily UpdateNEWS

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महेश सुतार शिवदूत यांच्या मागणीला यश

Share Post

सुस खिंड परिसरातील तीव्र चढ असलेल्या रस्त्यावरून सतत येणाऱ्या R.M.C मिक्सर ट्रकांमुळे मोठ्या प्रमाणात खडी माल रस्त्यावर साचत होता. पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी वारंवार साफसफाई करत असले तरी R.M.C गाड्यांची संख्या मोठी असल्यामुळे या रस्त्यावर सतत घसरून अपघात होण्याचा धोका वाढत होता.या गंभीर प्रश्नाची दखल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवदूत महेश भिमराव सुतार यांनी घेऊन प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. या संदर्भात महेश सुतार यांनी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी दोन-तीन वेळा पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली.आज पुन्हा महेश सुतार शिवदूत व शाखा संघटक सूरज चोरमले यांनी अप्पर पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

चर्चेनंतर पोलिस प्रशासनाने महेश सुतार यांच्या मागणीला मान्यता देत पुणे मनपा अधिकाऱ्यांना तातडीने हाइट बॅरिअर बसविण्याचे निर्देश दिले.यामुळे आता सुस खिंड रस्त्यावर R.M.C गाड्यांची वाहतूक बंद होणार असून, रस्त्यावर खडी साचण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हा निर्णय स्वागतार्ह असून या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे.