संतोष पाचांगणे यांना शौर्य समाजरत्न पुरस्कार प्रदान
राजमुद्रा वेल्फेअर फाउंडेशन, पुणे (महाराष्ट्र) या सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक तसेच उत्कृष्ट राजकीय कार्य केल्याबद्दल श्री. संतोष पाचांगणे यांना “शौर्य समाजरत्न पुरस्कार 2025” प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार शय अकॅडमी, हडपसर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दशरथ यादव तसेच करिअर अकॅडमीचे संचालक हरिदास भिसे सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी श्री. दशरथ यादव यांनी संतोष पाचांगणे यांच्या सामाजिक बांधिलकीचा आणि जनतेसाठी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख करत “समाजासाठी सातत्याने झटणारा व उत्कृष्ट राजकीय जाण असलेला कार्यकर्ता” असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करिअर अकॅडमीचे संचालक हरिदास भिसे हे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर माजी नगरसेवक सुनीलदादा बनकर, रेश्मा भिसे, दादासाहेब सोनवणे, आदिक ओव्हाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.पुरस्कार स्वीकारताना संतोष पाचांगणे यांनी समाजसेवा हीच आपली खरी प्रेरणा असल्याचे सांगत, भविष्यातही सामाजिक व जनहिताच्या कार्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.समाजासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत सन्मानित करण्यात आलेला हा पुरस्कार संतोष पाचांगणे यांच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनातील कार्याला नवी ऊर्जा देणारा ठरला आहे.


