‘सुड शकारंभ’चा दमदार पोस्टर प्रदर्शित१६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
सत्तासंघर्ष, विश्वासघात आणि रक्तरंजीत वास्तवाचा थरार!
ज्योती पाटील प्रस्तुत आणि राजनील फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘सुड शकारंभ’चा दमदार पोस्टर प्रदर्शित
१६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला ‘सुड शकारंभ’चा दमदार पोस्टर प्रदर्शित१६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
गावाच्या मातीमध्ये दडलेली सत्ता, अहंकार, सूड आणि संतापाची ज्वालामुखी उसळताना दाखवणारा जबरदस्त मराठी अॅक्शन–ड्रामा–थ्रिलर ‘सुड शकारंभ’ येत्या १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा थरारक आणि आशयघन पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
पोस्टरमध्ये रक्ताने माखलेला एक हात दगड घट्ट पकडून उभा दिसतो. हा दगड सूड, संताप आणि हिंसक संघर्षाचं प्रभावी प्रतीक ठरतो. साधी पण गंभीर पार्श्वभूमी आणि लाल रंगातील धारदार शीर्षक चित्रपटाच्या कठोर, वास्तवदर्शी आणि सूडाने पेटलेल्या कथानकाची झलक दाखवतं. पोस्टर पाहताक्षणीच चित्रपटातील संघर्ष, हिंसा आणि सत्तेचा खेळ प्रेक्षकांच्या मनात खोलवर ठसतो.
‘सुड शकारंभ’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी शोएब खतीब यांनी समर्थपणे सांभाळली आहे. ग्रामीण राजकारणाच्या वास्तवाशी प्रामाणिक राहून त्यांनी एक तीव्र, अंगावर काटा आणणारा आणि थरारक सिनेमॅटिक अनुभव साकारला आहे. ज्योती पाटील प्रस्तुत आणि राजनील फिल्म प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे सहयोगी निर्माता दत्तसंग्राम वासमकर असून, मातीतला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या चित्रपटात मनीषा मोरे, आयुष उलघडे, ओम पानस्कर, सुनील सूर्यवंशी, अनिल राबाडे, ऐश्वर्या मल्लिकार्जुन, सोनाली घाडगे, सलोनी लोखंडे, राज साने आणि मारुती केंगार यांच्या दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक कलाकाराने आपल्या व्यक्तिरेखांमधून गावातील सत्ता, संघर्ष आणि सूडाची आग अधिक तीव्रपणे उभी केली आहे.
चित्रपटाचे कार्यकारी निर्माते श्रीराज पाटील असून, संगीत व पार्श्वसंगीताची धग विकी वाघ आणि आर. तिरूमल यांनी दिली आहे. मनीष राजगिरे, हर्षवर्धन वावरे, विकी वाघ आणि मयुरी जाधव यांच्या आवाजामुळे संगीत अधिक भावस्पर्शी आणि परिणामकारक झाले आहे. चित्रपटाचे संगीत पॅनोरमा म्युझिकच्या लेबलअंतर्गत प्रदर्शित होत आहे.
ग्रामीण राजकारणाच्या काळ्या–पांढऱ्या छटांना प्रभावीपणे टिपण्यासाठी छायाचित्रणाची धुरा रोहण पिंगळ आणि अमेय तानवडे यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे संकलन रोहित रुकडे, कला दिग्दर्शन सोनाली घाडगे, प्रॉडक्शन मॅनेजमेंट जीत शहा, दिगंबर शिंदे आणि ओंकार गूळीक, पब्लिसिटी डिझाईन स्कारलेट स्टुडिओज्, पी.आर. प्रज्ञा शेट्टी, तर सोशल मीडियाची जबाबदारी अश्मिकी टिळेकर यांनी सांभाळली आहे. सीईओ राजेश मेनन यांचे सहकार्य लाभले असून, सनशाईन स्टुडिओझ यांचेही मोलाचे योगदान या चित्रपटाला मिळाले आहे.
‘सुड शकारंभ’ हा केवळ एक चित्रपट नसून, सत्तेच्या खेळात माणूस कसा बदलतो, नात्यांवर कुऱ्हाड कशी चालते आणि गावाच्या शांततेत कशी रक्तरंजित आग पेटते याचा थरारक आरसा आहे.
ज्योती पाटील प्रस्तुत आणि राजनील फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘सुड शकारंभ’ — १६ जानेवारी २०२६ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा.


