Daily UpdateNEWSPune | NEWS

गणेश बिडकरांचा उपक्रम, प्रभाग २४ मधील नागरिकांना मोठा दिलासा ’एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ पॅटर्न चर्चेत

Share Post

पुणे महानगरपालिकेवर मागील तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने लोकनियुक्त नगरसेवक नसल्याचा परिणाम थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. किरकोळ नागरी कामांसाठीही महापालिकेच्या कार्यालयात वारंवार हेलपाटे घालावे लागत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला होता. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सुरू केलेला ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ हा उपक्रम प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांसाठी आशेचा किरण ठरला आहे.गणेश बिडकरांचा उपक्रम, प्रभाग २४ मधील नागरिकांना मोठा दिलासा एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ पॅटर्न चर्चेत

महापालिकेची निवडणूक प्रलंबित असतानाही नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित राहू नयेत, यासाठी गणेश बिडकर यांनी स्वतंत्र व कार्यक्षम यंत्रणा उभी केली आहे. पाणीपुरवठा, मलनिःसारण, रस्ते दुरुस्ती, पथदिवे, बांधकाम परवाने, देखभाल-दुरुस्ती तसेच सांस्कृतिक विभागाशी संबंधित अनेक तक्रारी नागरिकांना पूर्वी थेट कार्यालयात जाऊन मांडाव्या लागत होत्या. मात्र आता एका फोन कॉलवर तक्रारीची नोंद घेतली जाते आणि संबंधित विभागाशी समन्वय साधत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन समस्या मार्गी लावली जाते.

या उपक्रमामुळे वेळेची बचत होत असून, शासकीय कार्यालयातील फेऱ्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत नाही. तक्रार आल्यानंतर ती प्रलंबित न ठेवता तातडीने उपाययोजना केल्या जात असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासकीय काळात लोकप्रतिनिधी नसल्याने निर्माण झालेली पोकळी ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ उपक्रमामुळे भरून निघत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

प्रभाग २४ मधील अनेक नागरिकांनी या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असून, प्रशासन काळातही लोकसेवा प्रभावीपणे करता येते, हे या पॅटर्नमधून स्पष्ट होत आहे. गणेश बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली टीम सातत्याने नागरिकांच्या संपर्कात असून, प्रत्येक समस्येची गांभीर्याने दखल घेतली जात आहे.

याबाबत बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “नगरसेवक हा नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा असतो. नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळावी, या हेतूने ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ उपक्रमाची सुरुवात केली. महापालिका नसली तरी नागरिकांच्या समस्या थांबत नाहीत, त्यामुळे त्या सोडवणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे.”

एकूणच, गणेश बिडकरांचा ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ हा पॅटर्न प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांसाठी दिलासादायक ठरत असून, प्रशासन काळातही लोकप्रतिनिधींची गरज आणि भूमिका किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित करणारे ठोस उदाहरण बनले आहे.

गणेश बिडकरांचा उपक्रम, प्रभाग २४ मधील नागरिकांना मोठा दिलासा एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ पॅटर्न चर्चेत
गणेश बिडकरांचा उपक्रम, प्रभाग २४ मधील नागरिकांना मोठा दिलासा एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ पॅटर्न चर्चेत