कसबा ते नाना पेठपर्यंत तरुणांच्या भविष्यासाठी उजळलेला प्रकाशस्तंभ; लाईट हाऊस प्रोजेक्टची यशोगाथा
वस्तीभागातील तरुण मुला-मुलींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख आणि प्रभाग क्रमांक २४ ड चे उमेदवार गणेश बिडकर यांनी राबवलेला ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. शिक्षणाअभावी रोजगाराच्या संधींपासून वंचित राहणाऱ्या तरुणांच्या सुप्त कला-कौशल्यांना योग्य दिशा देत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून सुरू आहे.कसबा ते नाना पेठपर्यंत तरुणांच्या भविष्यासाठी उजळलेला प्रकाशस्तंभ; लाईट हाऊस प्रोजेक्टची यशोगाथा
वस्तीभागातील अनेक तरुण-तरुणींना आर्थिक परिस्थितीमुळे औपचारिक शिक्षण पूर्ण करता येत नाही. मात्र शिक्षण नसले तरी या तरुणांमध्ये विविध कला, कौशल्ये आणि मेहनत करण्याची तीव्र इच्छा असते. हीच बाब ओळखून गणेश बिडकर यांनी त्यांच्या कौशल्यांचा विकास करून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, तसेच इतर तरुणांप्रमाणेच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आत्मविश्वास मिळावा, या हेतूने २०२१ साली सोमवार पेठेतील भोलागिरी येथील महानगरपालिकेच्या शाळेत **‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’**ची सुरुवात केली.
या प्रकल्पाचा मोठा लाभ कसबा पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, गणेश पेठ आदी भागांतील वस्तीमध्ये राहणाऱ्या तरुण-तरुणींना झाला आहे. वस्तीपातळीवरील युवकांसाठी रोजगारनिर्मिती हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असून, १८ ते ३० वयोगटातील तरुणांना एक महिन्याचे सघन आणि कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे तरुणांना स्वतःची करिअरविषयक स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्याची संधी मिळत असून, स्वतःसह कुटुंबासाठी उपजीविकेचे भक्कम साधन निर्माण होत आहे.२०२१ ते २०२५ या कालावधीत १५०० हून अधिक तरुण-तरुणींनी या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण घेतले असून, त्यापैकी ५५० हून अधिक तरुण-तरुणींना प्रत्यक्ष नोकऱ्या मिळाल्या आहेत. हे आकडे ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’च्या यशाची ठोस साक्ष देणारे ठरत आहेत.
या प्रकल्पात प्रशिक्षण देण्यापूर्वी इच्छुक तरुण-तरुणींची सखोल करिअर टेस्ट घेतली जाते. त्यांच्या आवडी, गुणवत्ता, क्षमता आणि व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून त्यानुसार योग्य क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमाअंतर्गत टॅली, कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलरिंग, ब्युटी पार्लर, हेल्थ सेक्टर, जिम इन्स्ट्रक्टर, नर्सिंग असिस्टंट, कुकिंग, ग्राफिक डिझाईन तसेच विविध सॉफ्टवेअर लँग्वेजेस यांसारख्या रोजगाराभिमुख कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते.उच्च दर्जाचे आणि गरजाधिष्ठित प्रशिक्षण मिळाल्यामुळे वस्तीभागातील अनेक तरुणांचे जीवनमान लक्षणीयरीत्या सुधारले आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे अनेक तरुण गुन्हेगारी किंवा चुकीच्या मार्गाकडे वळण्यापासून वाचले असून, समाजाच्या मुख्य प्रवाहात येत स्वतःचे करिअर घडवत उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’च्या माध्यमातून तरुणांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश पसरवत, समाजघडणीचे भक्कम कार्य गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.


