Daily UpdateNEWSPune | NEWS

२५ वर्षांची समाजाशी नाळ; ‘आपला माणूस’ म्हणून ओळख निर्माण करणारे गणेश बिडकर

Share Post

सक्रिय राजकारणात पाऊल ठेवून तब्बल २५ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास पूर्ण करणारे गणेश बिडकर हे आजही स्वतःला सामान्य कार्यकर्ता म्हणूनच ओळखतात. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेता अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवूनही त्यांनी कधीही जनतेपासून दुरावा निर्माण होऊ दिला नाही. सत्तेपेक्षा सेवा महत्त्वाची, हा त्यांचा मूलमंत्र आजही तितक्याच ठामपणे दिसून येतो.२५ वर्षांची समाजाशी नाळ; ‘आपला माणूस’ म्हणून ओळख निर्माण करणारे गणेश बिडकर

प्रभागातील कोणतेही छोटे-मोठे प्रश्न असोत, नागरिकांनी एक हाक दिली की गणेश बिडकर कुटुंबातील सदस्यासारखे तत्काळ मदतीसाठी धावून जातात. वडिलांकडून जपलेल्या सामाजिक नात्यांची ही परंपरा त्यांनी पुढेही तितक्याच प्रामाणिकपणे जपली आहे. या साधेपणा, आपुलकी आणि सातत्यामुळेच प्रभागात त्यांची ओळख ‘आपला माणूस’ अशी रुजली असून नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा लाभतो आहे.

प्रभाग क्रमांक २४ (कसबा पेठ परिसर) मधून भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेले गणेश बिडकर २००२ साली प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले. दुसऱ्या कार्यकाळानंतर २०११-१२ या कालावधीत त्यांना स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. महापालिकेत सत्ता नसतानाही त्यांनी आपल्या मुत्सद्दी नेतृत्वगुणांच्या जोरावर पद मिळवून प्रभागातील विकासकामांना गती दिली.

या काळात श्री नागेश्वर मंदिर व त्रिशुंड गणपती मंदिराच्या जीर्णोद्धाराची महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागली. कमला नेहरू रुग्णालयाच्या विकासकामांना गती मिळाली. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचा दुवा म्हणून काम करत त्यांनी सातत्याने निधी मिळवून विविध प्रश्न सोडवले.

मेट्रो प्रकल्प तसेच ‘जायका’ प्रकल्पांना मंजुरी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. २०२० ते २०२२ या कालावधीत सभागृहनेतेपदाची जबाबदारी सांभाळताना चोवीस तास पाणीपुरवठा योजना, नदी पुनरुज्जीवन, कचरा व्यवस्थापन, मेट्रोसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना त्यांनी निर्णायक गती दिली.

समाजाशी असलेली घट्ट बांधिलकी, विकासाबाबतची ठाम भूमिका आणि पक्षाशी निष्ठावान राहण्याची वृत्ती यामुळेच तिसऱ्या कार्यकाळात पक्षाने त्यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली होती. २५ वर्षांच्या राजकीय प्रवासात ‘सामान्य कार्यकर्ता’ ही ओळख न सोडणारे गणेश बिडकर हे आजही नागरिकांच्या विश्वासाचं भक्कम केंद्रबिंदू ठरत आहेत.

२५ वर्षांची समाजाशी नाळ; ‘आपला माणूस’ म्हणून ओळख निर्माण करणारे गणेश बिडकर