जनतेच्या सहभागातून सक्षम प्रभागाकडे वाटचाल : सनी विनायक निम्हण यांचा नवा प्रयोग
लोकप्रतिनिधीपद म्हणजे केवळ अधिकाराचे स्थान नसून, जनतेने दिलेल्या विश्वासाची मोठी जबाबदारी असते. नागरिकांच्या अडचणी समजून घेणे, त्यावर परिणामकारक उपाय शोधणे आणि लोकांशी थेट संवाद राखणे, हीच एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून अपेक्षित भूमिका असते. विशेष म्हणजे, जेव्हा हा लोकप्रतिनिधी उच्चशिक्षित, आधुनिक विचारसरणीचा आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करणारा असतो, तेव्हा विकास अधिक सुस्पष्ट, वेगवान आणि परिणामकारक ठरतो. परदेशात उच्च शिक्षण घेऊन पुण्यात सक्रिय समाजकारणातून राजकारणात प्रवेश केलेले सनी विनायक निम्हण हे अशाच नव्या पिढीच्या नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करतात.जनतेच्या सहभागातून सक्षम प्रभागाकडे वाटचाल : सनी विनायक निम्हण यांचा नवा प्रयोग
कल्पक दृष्टिकोन, ठोस धोरणे आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या त्रिसूत्रीवर आधारित कार्यपद्धतीवर सनी निम्हण यांचा ठाम विश्वास आहे. लोकांच्या सहभागातूनच आदर्श प्रभाग आणि सक्षम समाज घडू शकतो, ही त्यांची ठाम भूमिका असून, त्याच विचारधारेतून त्यांची राजकीय वाटचाल पुढे जात आहे.
पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून कार्य करताना सनी निम्हण यांनी Policy, Planning आणि Public Participation (3P) या संकल्पनेवर आधारित प्रशासन मॉडेल प्रभावीपणे राबवले. याच विचारातून त्यांनी ‘Solve with Sunny’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमांतर्गत‘विकासासाठी सूचना देऊया – सगळे मिळून आदर्श प्रभाग घडवूया’ हा लोकाभिमुख आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे.
या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रभागातील आठ ठिकाणी विशेष सूचना केंद्र उभारण्यात आली होती. शेकडो नागरिकांनी QR कोड स्कॅन करून Google Form च्या माध्यमातून प्रभागाच्या विकासासाठी आपल्या सूचना नोंदवल्या. अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या अपेक्षा मांडल्या तसेच तक्रारी नोंदविल्या. प्राप्त झालेल्या सर्व सूचना व तक्रारींचा सखोल अभ्यास करून त्या आगामी वचननाम्यात समाविष्ट केल्या जाणार असून, पुढे हाच वचननामा प्रत्यक्षात विकासनामा ठरेल, असा ठाम विश्वास सनी निम्हण यांनी व्यक्त केला आहे.
या उपक्रमाच्या यशासाठी सनी निम्हण स्वतः प्रभागातील सोसायट्या आणि वस्ती विभागात भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. ही लोकसहभागाची कार्यपद्धती त्यांच्या नेतृत्वाची वेगळी ओळख ठरत आहे.
माजी आमदार विनायक निम्हण यांचा समृद्ध राजकीय आणि सामाजिक वारसा सनी निम्हण यांना लाभला आहे. मात्र, त्या वारशाला आधुनिक शिक्षण, आंतरराष्ट्रीय अनुभव आणि नव्या विचारांची जोड देत त्यांनी स्वतःची स्वतंत्र व ठळक ओळख निर्माण केली आहे. राजकारणासोबतच समाजकारणातही त्यांचा सक्रिय सहभाग सातत्याने दिसून येतो.
माजी नगरसेवक असलेले सनी निम्हण हे पुन्हा एकदा औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांच्या संयुक्त वतीने निवडणूक रिंगणात उतरले आहेत.लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि शाश्वत विकास या तीन भक्कम आधारस्तंभांवर प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवण्याचा त्यांचा ठाम संकल्प आहे.


