प्रभाग ८ मध्ये सनी निम्हण यांचा प्रचार जोमात; पदयात्रेत नागरिकांचा सहभाग वाढला
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असून भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार सनी विनायक निम्हण यांनी प्रभावी प्रचार करत आघाडी घेतली आहे. त्यांच्या वतीने बोपोडी परिसरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.प्रभाग ८ मध्ये सनी निम्हण यांचा प्रचार जोमात; पदयात्रेत नागरिकांचा सहभाग वाढला
या पदयात्रेत प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
सकाळच्या सत्रात औंध येथील सानेवाडी आय.टी.आय. रोड परिसरात पदयात्रा काढत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. त्यानंतर सायंकाळच्या सत्रात बोपोडीतील मानाजी बाग, भोईटे वस्ती या भागांमध्ये प्रचार करण्यात आला. पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या अपेक्षांवर संवाद साधला.
या वेळी मूलभूत विकास, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता तसेच विविध नागरी प्रश्नांवर भर देत उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ठिकठिकाणी नागरिकांनी पदयात्रेचे स्वागत करत विकासाबाबत आपल्या सूचना आणि समस्या मांडल्या. या संपूर्ण पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


