गणेश बिडकरांच्या दूरदृष्टीतून प्रभाग २४ अधिक सुरक्षित; १७० सीसीटीव्हींचे मजबूत सुरक्षा जाळे
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत भाजपचे अधिकृत उमेदवार गणेश बिडकर यांच्या दूरदृष्टी आणि भविष्यकालीन व्हिजनमुळे प्रभाग क्रमांक २४ मध्ये आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेचे मजबूत सुरक्षा कवच उभे राहिले आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सोमवार पेठ परिसरात महापालिकेच्या निधीतून तब्बल १७० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, त्यामुळे प्रभागातील कायदा-सुव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे.गणेश बिडकरांच्या दूरदृष्टीतून प्रभाग २४ अधिक सुरक्षित; १७० सीसीटीव्हींचे मजबूत सुरक्षा जाळे
या उपक्रमांतर्गत कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटल परिसरातील मध्यवर्ती भागांचा समावेश करण्यात आला आहे. प्रभागातील २४ प्रमुख चौक, ६० मोक्याची ठिकाणे, तसेच शाळा, रुग्णालये, एटीएम आणि बस थांबे अशा गर्दीच्या ठिकाणी काळजीपूर्वक नियोजन करून कॅमेरे बसवण्यात आले आहेत. परिणामी समर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ८० टक्के भाग आता सीसीटीव्ही निगराणीखाली आला आहे.
या प्रगत यंत्रणेमुळे पोलिसांना गर्दीवर सातत्याने लक्ष ठेवणे सुलभ झाले असून, गुन्हेगारी घटनांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येत आहे. त्याचबरोबर पोलिस यंत्रणेवरील ताणही लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. पालखी सोहळा, गणेशोत्सव आणि विविध सामाजिक कार्यक्रमांच्या काळात प्रचंड गजबजणाऱ्या या पेठ परिसरात नागरिकांची सुरक्षा अधिक भक्कम झाली असून, गुन्हेगारांवर ठोस वचक बसल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रचारादरम्यान नागरिकांकडूनही या सीसीटीव्ही व्यवस्थेचे विशेष कौतुक होत असून, सुरक्षित प्रभागासाठी बिडकरांनी उचललेले पाऊल सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
यासंदर्भात बोलताना गणेश बिडकर म्हणाले की, भविष्यात प्रभागाच्या सुरक्षेसाठी आणखी आधुनिक आणि प्रगत सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य राहील. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना अधिकाधिक सुविधा देणे, त्यांचे जीवनमान उंचावणे आणि दहशतमुक्त वातावरण निर्माण करणे हा माझा मुख्य उद्देश आहे. कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना पुढील काळातही सातत्याने राबवण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला


