मॉर्निंग वॉकमधून जनसंवाद! प्रभाग २४ मध्ये गणेश बिडकरांचा नागरिकांशी थेट संवाद
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ चे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गणेश बिडकर यांनी सोमवारी सोमवार पेठेतील शाहू उद्यान येथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला मतदार तसेच स्थानिक खेळाडूंशी थेट संवाद साधत व्यापक जनसंपर्क मोहीम राबवली. या भेटीत त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठीचा भविष्यातील रोडमॅप मांडला.मॉर्निंग वॉकमधून जनसंवाद! प्रभाग २४ मध्ये गणेश बिडकरांचा नागरिकांशी थेट संवाद
मॉर्निंग वॉकदरम्यान गणेश बिडकर यांनी ज्येष्ठ नागरिकांशी सखोल चर्चा केली. ज्येष्ठांसाठी सुरक्षित वातावरण, आरोग्यविषयक सुविधा, विरंगुळ्याची ठिकाणे आणि दैनंदिन सोयी-सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत समाधान व्यक्त करत ज्येष्ठ नागरिकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
या पक्षप्रवेशाच्या वेळी आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, निवडणूक प्रमुख व भाजप उमेदवार गणेश बिडकर यांच्यासह प्रभागातील सर्व उमेदवार व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष विशाल पवार यांच्यासह मनोज गुप्ता, यश मोर, तन्मय पवार, ऋषी सोलंकी, अथर्व टेंबे, साई राऊत, अथर्व उर्फ सोन्या वाघमारे, ऋषी सुकलेजा, राज मोरे, भगवान शिंदे, मंदार पाचोरे, मंदार माळवदकर आणि ओमकार भोसले यांचा समावेश आहे. यांच्यासोबतच अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे
हे सर्व पदाधिकारी प्रभागातील सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय होते. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे मनसेच्या प्रभागातील संघटनात्मक रचनेला मोठे खिंडार पडले असून, भाजपाचा विजयमार्ग अधिक सुकर झाला आहे.प्रभाग २४ मध्ये गणेश बिडकर यांनी राबवलेल्या विकासकामांमुळे नागरिकांचा विश्वास दृढ झाला आहे. विकासाच्या मुद्द्यावर समाधानी असलेल्या कार्यकर्त्यांचा कल भाजपकडे वाढत असून, त्यामुळे सर्वच पक्षांतील प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे स्पष्ट होत आहे.या घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक २४ मध्ये भाजप अधिक मजबूत होत असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाची शक्यता अधिक बळावली आहे.


