प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावतीत भाजपाचा जोरदार प्रचार;शैलजा अरुण भोसले ठरत आहेत नारीशक्तीचा विश्वासार्ह आवाज
प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावती परिसरात भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक गती मिळत असून, भाजपाच्या पदयात्रा, घरोघरी भेटी व संवाद उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या प्रचार फेऱ्यांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण तसेच व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असून “विकास, सुरक्षितता आणि विश्वास” या मुद्द्यांवर भाजपाला स्पष्ट पाठिंबा देताना दिसत आहेत.प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावतीत भाजपाचा जोरदार प्रचार | शैलजा अरुण भोसले नारीशक्तीचा विश्वासार्ह आवाज
घराघरांत भाजप सरकारच्या विकासकामांची, केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची सकारात्मक चर्चा सुरू आहे. विशेषतः महिलांसाठी राबविण्यात आलेल्या ‘लाडकी बहिण योजना’ मुळे महिलांना आर्थिक आधार, आत्मविश्वास आणि स्वाभिमान मिळाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याने नारीशक्ती भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट चित्र प्रभागात दिसून येत आहे.

या प्रभागातील क गटातून भाजपाच्या उमेदवार शैलजा अरुण भोसले या सध्या विशेष चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून, त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव, महिलांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशील व तत्पर भूमिका यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आधुनिक श्रावण बाळ (अनिरुद्ध बापू भोसले) यांच्या मातोश्री असलेल्या शैलजा भोसले या कायम लोकसंपर्कात राहणाऱ्या, समस्या ऐकून त्यावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्या नेतृत्त्व म्हणून ओळखल्या जातात.
यावेळी बोलताना शैलजा अरुण भोसले म्हणाल्या,“भाजप सरकारने महिलांसाठी केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात प्रभावी योजना राबवल्या आहेत. लाडकी बहिण योजना ही महिलांच्या स्वाभिमानाला बळ देणारी असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण काम सरकारने केले आहे. प्रभाग क्रमांक ३६ मधील पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला सुरक्षा, रस्ते, ड्रेनेज व मूलभूत नागरी सुविधा या माझ्या प्राथमिकता असतील. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही.”
प्रभाग क्रमांक ३६ मध्ये भाजपाने अनुभव, कार्यक्षमता आणि जनतेचा विश्वास असलेली मजबूत व संतुलित उमेदवारांची टीम उभी केली आहे.
अ गटातून भाजप अधिकारी गणेश घोष यांच्या पत्नी विनाघोष,ब गटातून माजी नगरसेवक शिवलाल भोसले यांच्या वहिनी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आधुनिक श्रावण बाळ यांच्या मातोश्री शैलजा अरुण भोसले,क गटातून भाजपाचा युवा व ऊर्जावान चेहरा सई प्रशांत थोपटे, ड गटातून अनुभवी आणि विश्वासार्ह नेतृत्व म्हणून महेश वाबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अनुभव, विकासदृष्टी, संघटनशक्ती आणि जनतेच्या विश्वासावर आधारित ही संपूर्ण टीम मैदानात उतरल्याने प्रभाग क्रमांक ३६ मध्ये “चर्चा भाजपाचीच” असे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

प्रभाग क्रमांक 36, सहकारनगर पद्मावती, bjp pune news, shailaja arun bhosale, pmc election 2026, pune municipal election, bjp prachar pune, ladki bahin yojana, pune ward 36 news, maharashtra politics marathi

