Latest News

विजयादशमी निमित्त दुर्गामाता प्रतिष्ठानतर्फे भव्य सोहळा

Share Post

दुर्गामाता प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी विजयादशमीच्या निमित्ताने दुर्गामातेच्या मंदिरात भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. देवीची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि जयकारांच्या घोषात मोठ्या दिमाखात काढण्यात आली.गावभर रंगीबेरंगी रांगोळ्या, फुलांच्या तोरणांनी सजलेले रस्ते आणि भगव्या पताका यांनी संपूर्ण परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते. दोन तास चाललेल्या गोंधळी वादनाने उपस्थित भक्तांची मने जिंकली. कलाकारांच्या दमदार वादनाने वातावरण दुमदुमून गेले आणि भाविकांनी या क्षणांचा मनमुराद आनंद घेतला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष नरेंद्र पारखे यांनी केले. त्यांच्या उत्साहवर्धक नेतृत्वामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. उपस्थित नागरिक, मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी पारखे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या

👉 या सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. अखंड हरिनाम संकीर्तन, देवीच्या आरत्या आणि विविध धार्मिक उपक्रमांनी विजयादशमीचा दिवस खरोखरच संस्मरणीय बनवला.