माजी सैनिकाच्या मुस्लिम कुटुंबावर समाजकंटकांकडून दहशतीचा प्रयत्न
📍 पुणे | दिनांक: 28 जुलै 2025
पुण्यातील चंदननगर परिसरात एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. भारतीय सैन्यात सेवा बजावलेले माजी सैनिक शमशाद अली शेख यांच्या कुटुंबावर 26 जुलैच्या रात्री 12 वाजता स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या 70-80 समाजकंटकांनी हल्ला चढवला.माजी सैनिकाच्या मुस्लिम कुटुंबावर समाजकंटकांकडून दहशतीचा प्रयत्न
🏠 55 वर्षांपासून राहत असलेल्या कुटुंबावर दबाव:
शेख कुटुंबीयांचे आजोबा आणि चुलते भारतीय सैन्यात सन्मानाने सेवा करून निवृत्त झालेले आहेत. त्यांना पदके देखील प्राप्त झाली आहेत. हे कुटुंब 55 वर्षांहून अधिक काळ चंदननगर परिसरात राहत आहे.
❌ आक्षेपार्ह भाषेचा वापर:
समाजकंटकांनी घरात घुसून “रोहिंग्या”, “लांडे” असे आक्षेपार्ह शब्द वापरत त्यांना “इथून निघून जा” अशी धमकी दिली.
🚨 पोलिसांचा निष्क्रियपणा:
या घटनेवेळी पोलीस उपस्थित असूनही त्यांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही. रात्री 3.30 वाजेपर्यंत पीडित कुटुंबाला पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आले. त्यात वयोवृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक, 12-13 वर्षांची लहान मुलंही होती.
📢 अल्पसंख्याक संघटनांचा संताप:
नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पोलीस उपायुक्त सोमय्या मुंडे यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनाही निवेदन दिलं जाणार आहे.
✊ लाक्षणिक धरणे आंदोलन:
या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवार, ३१ जुलै रोजी येरवडा पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन होणार आहे.
