Daily UpdateNEWS

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने मिळवले हृदय प्रत्यारोपणात 100% यश!

Share Post

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने 2017 पासून 10 हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून यशाचा 100% निकाल लावत प्रत्यारोपण प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. एका विशेष कार्यक्रमात हृदय प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांपैकी 5 रुग्णांचा सत्कार करण्यात आला. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद आणि सीव्हीटीएस चे वरिष्ठ सल्लागार डॉ. संजीव जाधव यांनी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडली.नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने मिळवले हृदय प्रत्यारोपणात 100% यश!

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील सीव्हीटीएस चे वरिष्ठ सल्लागार, हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद डॉ. संजीव जाधव यांनी अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील हृदय प्रत्यारोपण प्रक्रियेच्या यशामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे.

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने मिळवले हृदय प्रत्यारोपणात 100% यश!
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने मिळवले हृदय प्रत्यारोपणात 100% यश!

या प्रसंगी डॉ. जाधव म्हणाले, “हृदय प्रत्यारोपणामुळे हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यातील व्यक्तींना पुन्हा एकदा नवी संधी मिळते. आम्ही केलेली हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया म्हणजे नवीन बाय-कॅव्हल (bi-caval) तंत्र होते, ज्यामध्ये रोगग्रस्त किंवा निकामी झालेले हृदय काढून टाकले जाते आणि त्याच्या जागी निरोगी दात्याने दिलेले हृदय बसवले जाते. बाय-कॅव्हल (bi-caval) तंत्र ऍट्रिया किंवा हृदयाच्या वरच्या चेंबरची सामान्य शरीर रचना कायम राखते आणि शस्त्रक्रियेदरम्यान व शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यास मदत करते. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील सर्वसमावेशक हृदयविज्ञान प्रक्रिया हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या व्यक्तींसाठी जीवनरक्षक उपाय प्रदान करते. आजपर्यंत 100% यशाच्या दरासह 10 हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया पूर्ण करून अद्वितीय यश मिळवल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे.”

डॉ. जाधव यांनी हृदय प्रत्यारोपणाच्या माध्यमातून जीवनात बदल घडलेल्या रुग्णांची ओळख करुन दिली. मुंबईतील मुलुंड येथे राहणाऱ्या एका 29 वर्षीय पुरुष रुग्णामध्ये डायलेटेड कार्डिओमायोपॅथी (डीसीएमपी) आणि 15% एवढे लेफ्ट वेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन (एलव्हीईएफ) चे निदान झाले होते, त्यामुळे 15 जुलै 2021 रोजी त्यांच्यावर ऑर्थोटॉपिक बाय-कॅव्हल हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर, रवी यांच्यामध्ये उल्लेखनीय सुधारणा दिसून आली, ज्यामध्ये एलव्हीईएफ 60% पर्यंत वाढले. 3 ऑगस्ट 2021 रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि आज ते परिपूर्ण आयुष्य जगत आहेत.

आणखी एक रुग्ण म्हणजे नाशिकमधील 40 वर्षीय पुरुष रुग्णाला इस्केमिक कार्डिओमायोपॅथी आणि 10% एवढे इजेक्शन फ्रॅक्शन (ईएफ) होते, या प्रक्रियेद्वारे त्यांनाही जगण्याची नवी आशा मिळाली आहे. 20 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्यावर ऑर्थोटॉपिक बाय-कॅव्हल (bi-caval) हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली, मग शस्त्रक्रियेनंतरच्या इकोकार्डियोग्राममध्ये 50% ईएफ दिसून आले. 16 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि आता ते पुन्हा सामान्य जीवन जगत आहेत.