Daily UpdateNEWS

दिव्यांगांना कृत्रिम मॉड्युलर पाय भारत विकास परिषदेकडून मोफत उपलब्ध

Share Post

भारत विकास परिषदेच्या पुणे येथील कायमस्वरूपी दिव्यांग केंद्रामार्फत येत्या वर्षात सुमारे 1200 दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय मोफत देण्याचा मोठा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प महानगर नैसर्गिक वायू लिमिटेड (MNGL) यांच्या आर्थिक सहकार्यामुळे साकारत आहे.

या उपक्रमाची घोषणा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रमुख विनय खटावकर यांनी केली. यावेळी परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ता चितळे आणि महानगर गॅसच्या ऋतुजा पायगुडे उपस्थित होत्या. काही दिव्यांगांना प्रातिनिधिक स्वरूपात कृत्रिम पाय देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.


🎯 परिषदेकडून माहिती

  • पुण्यातील हे दिव्यांग केंद्र मागील २५ वर्षांपासून कार्यरत आहे.
  • देशभरात परिषदेची १३ कायमस्वरूपी दिव्यांग केंद्रे आहेत.
  • एप्रिल २०२५ मध्ये आयोजित राज्यस्तरीय महा-दिव्यांग शिबिरात ८९२ दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली.
  • आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाची किंमत ५० हजारांपेक्षा जास्त, मात्र हा पाय दिव्यांगांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे.

🌍 भारत विकास परिषदेची भूमिका

भारत विकास परिषद ही राष्ट्रव्यापी स्वयंसेवी संस्था असून समाजातील सर्वांगीण विकास, राष्ट्रभाव जागृती व सेवा कार्य यासाठी ओळखली जाते. देशभरात दरवर्षी ५ हजारांहून अधिक दिव्यांगांना कृत्रिम पाय, हात व कॅलिपर मोफत बसविण्यात येतात.


📞 संपर्कासाठी

दिव्यांगांनी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
📱 मोबाईल: 7378913197
☎️ दूरध्वनी: 020-29972349

दिव्यांगांना कृत्रिम मॉड्युलर पाय भारत विकास परिषदेकडून मोफत उपलब्ध