“ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेचा ‘आरपार’ सिनेमाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद | Box Office वर घातलाय धुमाकूळ”
प्रेमात वेडे असाल तर ‘आरपार’ला नक्की जाल!अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांची फ्रेश जोडी घेऊन आलेला ‘आरपार’ हा रोमँटिक सिनेमा सध्या महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत आहे.१२ सप्टेंबरपासून प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सिनेमातील रोमँटिक गाणी, हटके प्रेमकथा आणि जोशपूर्ण जागरण गोंधळमुळे थिएटरमध्ये तुफान गर्दी होत आहे.🎬 ललित–ऋता जोडीची कमालललित आणि ऋता यांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसत असून प्रेक्षक त्यांच्यावर अक्षरशः फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर सिनेमातील सीन आणि गाण्यांचे क्लिप्स जोरदार व्हायरल होत आहेत.ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेचा ‘आरपार’ सिनेमाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद | Box Office वर घातलाय धुमाकूळ
⭐ दमदार स्टारकास्टया चित्रपटात माधव अभ्यंकर, सुहिता हट्टे, स्नेहलता वसईकर, वीणा नायर, जान्हवी सावंत यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.🎶 संगीताची जादू‘आरपार’मधील रोमँटिक गाणी प्रेमात बुडवून टाकतात, तर जागरण गोंधळ थेट थिरकायला भाग पाडतो.🎥 दिग्दर्शन आणि निर्मिती‘लिऑन्स मीडिया प्रॉडक्शन एलएलपी’ प्रस्तुत, निर्माते नामदेव काटकर आणि रितेश चौधरी निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केले आहे. ललित प्रभाकरने अभिनयाबरोबर सहनिर्मात्याची जबाबदारीही सांभाळली आहे.
