Daily UpdateNEWSPune | NEWS

महापालिका निवडणूक पार पडताच भाजप ‘ॲक्शन मोड’वर, दोन पदाधिकाऱ्यांची थेट हकालपट्टी

Share Post

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडताच भारतीय जनता पार्टीने पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, प्रभाग क्रमांक २४ (कसबा – कमला नेहरू, के.ई.एम. हॉस्पिटल परिसर) येथे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.महापालिका निवडणूक पार पडताच भाजप ‘ॲक्शन मोड’वर, दोन पदाधिकाऱ्यांची थेट हकालपट्टी

निवडणूक काळात पक्षाच्या अधिकृत निर्णयांना धाब्यावर बसवत बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उज्वला गौड यांच्यावर सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याच प्रभागातील पदाधिकारी यश वालिया यांची देखील भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली असून, या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे मंडल अध्यक्ष विशाल कोंडे यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे निलंबन व हकालपट्टीचे पत्र अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहे. या पत्रामध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत घेतलेली भूमिका ही पक्षाच्या अधिकृत निर्णयांना, निर्देशांना व संघटनात्मक शिस्तीला पूर्णतः अवहेलना करणारी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने उचललेले हे पाऊल म्हणजे बंडखोरी, गटबाजी आणि पक्षविरोधी हालचालींना थेट इशारा