NEWS

बॉलीवूड स्टार विकी कौशलनच्या हस्ते पुण्यात कल्याण ज्वेलर्सच्या नवीन शोरूमचे उद्घाटन

Share Post

कल्याण ज्वेलर्सने आज पुण्यात आणखी एका शोरूमचे उद्घाटन केले. सातारा रोड येथील हे शोरूम शहरातील तिसरे आणि महाराष्ट्र राज्यातील 20 वे शोरूम आहे. बॉलीवूड स्टार विकी कौशलने या शोरूमचे उद्घाटन केले, ज्यात कल्याण ज्वेलर्सच्या विविध कलेक्शनमधील डिझाइन्सची विस्तृत श्रेणी आहे. जागतिक दर्जाच्या वातावरणासह ग्राहकांना इथे अत्याधुनिक सुविधा देत अतुलनीय अनुभव निर्माण होतो.बॉलीवूड स्टार विकी कौशलनच्या हस्ते पुण्यात कल्याण ज्वेलर्सच्या नवीन शोरूमचे उद्घाटन

यावेळी जमलेल्या गर्दीला संबोधित करताना बॉलीवूड स्टार विकी कौशल म्हणाला, “कल्याण ज्वेलर्सच्या नवीन शोरूमच्या उद्घाटनासाठी आज येथे उपस्थित राहून मला आनंद होत आहे. विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहक-केंद्रितता या तत्त्वांना आदर्श मानणाऱ्या कल्याण ज्वेलर्सचे प्रतिनिधित्व करणे हा एकप्रकारे सन्मान आहे. मला विश्वास आहे की, ग्राहक कल्याण ज्वेलर्सचे मनापासून स्वागत करतील, तेथील खरेदी अनुभवाचा आनंद घेत आणि कंपनीने ऑफर केलेल्या विविध दागिन्यांच्या कलेक्शनचा शोध घेतील.”नवीन शोरूमबद्दल भाष्य करताना, कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री. रमेश कल्याणरामन म्हणाले, “पुणे येथे कल्याण ज्वेलर्सचे नवीन शोरूम सुरू करून, एक सर्वसमावेशक परिसंस्था निर्माण करणे आणि ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांचा खरेदीचा अनुभवही या निमित्ताने वाढत आहे. कंपनीच्या विश्वास आणि पारदर्शकतेच्या नीतिमूल्यांचा आदर राखून, ग्राहकांना जागतिक दर्जाचे वातावरण निर्माण करून, स्वतःला पुन्हा शोधत राहण्याची आमची इच्छा आहे. कल्याण ज्वेलर्समध्ये आम्ही गुणवत्ता आणि सेवेवर लक्ष केंद्रित करून उत्कृष्ट व अद्वितीय दागिन्यांच्या डिझाइन्सची विस्तृत श्रेणी ऑफर करत राहू.”विशिष्ट ऑफर लाँच करण्याव्यतिरिक्त, “कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट,” जो बाजारातील सर्वात कमी आहे आणि कंपनीच्या सर्व शोरूममध्ये प्रमाणित आहे, लागू केला जाईल, जो एक अखंड आणि सेवा-समर्थित खरेदी अनुभव सुनिश्चित करेल.ग्राहकांना कल्याण ज्वेलर्सचे 4-स्तरीय हमी प्रमाणपत्रही मिळेल, जे शुद्धतेची हमी देते, दागिन्यांची मोफत आजीवन देखभाल, तपशीलवार उत्पादन माहिती आणि पारदर्शक देवाणघेवाण व बाय-बॅक पॉलिसी आदी सुविधा मिळतात. हे प्रमाणपत्र त्याच्या निष्ठावंत ग्राहकांना सर्वोत्तम ते देण्याची ब्रँडची वचनबद्धता दर्शविते.या शोरूममध्ये मुहूर्त (वेडिंग ज्वेलरी लाइन), मुद्रा (हँडक्राफ्टेड अँटिक ज्वेलरी), निमह (टेम्पल ज्वेलरी), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), झिया (सॉलिटेअरसारखी डायमंड ज्वेलरी), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्व (विशेष प्रसंगांसाठीचे हिरे), अंतरा (लग्नाचे हिरे), हेरा (डेली वेअर डायमंड्स), रंग (मौल्यवान दगडांचे दागिने) आणि नुकत्याच लाँच झालेल्या लीला (रंगीत स्टोन्स आणि डायमंड ज्वेलरी) यासह कल्याण ज्वेलर्सचे अन्य लोकप्रिय दागिनेही ठेवले जातील.ब्रँड, त्याचे कलेक्शन आणि ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी, https://www.kalyanjewellers.net/ ला भेट द्या

बॉलीवूड स्टार विकी कौशलनच्या हस्ते पुण्यात कल्याण ज्वेलर्सच्या नवीन शोरूमचे उद्घाटन
बॉलीवूड स्टार विकी कौशलनच्या हस्ते पुण्यात कल्याण ज्वेलर्सच्या नवीन शोरूमचे उद्घाटन