Latest News

हिमालयीन सतगुरूच्या सत्संगात सहभागी होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share Post

हिमालयीन सतगुरू श्री शिवकृपानंद स्वामीजी ध्यानस्थळ नागपूर येथे पुनरागमन करण्यास सज्ज असून, २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ध्यानस्थळ, मध्यभारत समर्पण आश्रम, ठाणा (पादरी), बुटीबोरी-उमरेड रोड, नागपूर येथे होणाऱ्या या आध्यात्मिक सत्संगाचा भव्य सोहळा साधकांसाठी सोनेरी संधी ठरणार आहे. या दिव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विशेष उपस्थित राहणार आहेत.

सतगुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींची दिव्य उपस्थितीसतगुरू श्री शिवकृपानंद स्वामीजी म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचे भांडार आहे. साधकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून ज्ञानार्जन करून आत्मिक आनंदाची अनुभूती घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नागपूर ही त्यांची जन्मभूमी असून गुजरात ही त्यांची कर्मभूमी आहे. आता नागपूरमध्ये ते पुढील अनेक वर्षांसाठी ऊर्जेचे एक केंद्र स्थापित करणार आहेत.

मंगलमूर्ती प्रतिष्ठापना – नागपूरकरांसाठी सोनेरी संधीमहानवरात्री अनुष्ठानाच्या शुभारंभासह ध्यानस्थळ नागपूर येथे हा अनोखा आध्यात्मिक समारोह होणार आहे. हिमालयीन सतगुरू आपल्या ऊर्जेद्वारे प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. हा सोहळा नागपूरकरांसाठी अतिशय दुर्मिळ आणि अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

गुरू परंपरेची उपस्थिती – साधकांसाठी दिव्य अनुभवमहानवरात्री अनुष्ठानादरम्यान सदगुरू स्थूल रुपात येतात आणि त्यावेळी त्यांच्या सर्व गुरूंची सूक्ष्मरुपात उपस्थिती असते. साधकांना गुरू परंपरेच्या ऊर्जेचा अनुभव घेण्याची अनोखी संधी येथे मिळणार आहे.

पूर्णाहुती समारोह – २ ऑक्टोबर २०२५महानवरात्री अनुष्ठानाचा परमोच्च क्षण २ ऑक्टोबरला होणारा पूर्णाहुती समारोह असेल. हजारो साधक या दिव्य कार्यासाठी ध्यानस्थळ नागपूर येथे एकत्र येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याचे महत्व अनेक पटींनी वाढणार आहे.सतगुरूंच्या शिकवणीनुसार सर्वोच्च प्रार्थना केल्याने साधकांची आध्यात्मिक प्रगती होते आणि जीवनातील इतर सर्व गरजा आपोआप पूर्ण होतात.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:70284 48555 / 86682 48204 / 91589 00074