NEWS

असोचॅम इंडिया इंटरनॅशनल फिनटेक फेस्टिव्हल 2024 मध्ये फाय कॉमर्सला “बेस्ट इन क्लास पेमेंट स्टार्टअप” पुरस्कार

Share Post

असोचेमच्या वार्षिक फिनटेक एक्सलन्स अवॉर्ड्स 2024 मध्ये फिनटेक गटातील प्रतिष्ठित “बेस्ट इन क्लास पेमेंट स्टार्टअप” हा पुरस्कार फाय कॉमर्सला देण्यात आला. ही माहिती जाहीर करताना अतिशय अभिमान वाटत असल्याचे फाय कॉमर्सने स्पष्ट केले.फिनटेक इकोसिस्टमसाठी आयोजित करण्यात आलेला व्दितीय इंडिया इंटरनॅशनल फिनटेक फेस्टिव्हल भारतातील अग्रगण्य व्यासपीठ ठरले आहे.असोचॅम इंडिया इंटरनॅशनल फिनटेक फेस्टिव्हल 2024 मध्ये फाय कॉमर्सला “बेस्ट इन क्लास पेमेंट स्टार्टअप” पुरस्कार

हा फेस्टिव्हल उ‌द्योगातील आघाडीच्या कंपन्यांना अग्रभागी राहण्यास मदत करण्यासाठी उच्च दर्जाची सामग्री (कंटेट) आणि नेटवर्किंगची अनोखी संधी कंपन्यांना प्रदान करतो. पेमेंट्स, लैंडिंग, वेल्थटेक, इन्सुरटेक आणि रेगटेक यासारख्या फिनटेक विश्वातील विविध विभागांचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आलेला आहे. या विशेष सोहळ्यात फिनटेक विश्वाचे सखोल विश्लेषण करण्यात आले. त्याचबरोबर प्रेरणादायी वक्त्यांनी रंजक माहितीही सादर केली. डिजिटल पेमेंट्स, फिनटेक आणि आर्थिक सेवा यासारख्या भविष्यकालीन संधींवर लक्ष केंद्रित करणारी जागतिक दर्जाची अंतर्दृष्टी उपस्थितांना यावेळी मिळाली. भारताचे डिजिटल पेमेंट विश्व झपाट्याने विकसित झाले असून, या क्षेत्राने देशाला जागतिक मापदंड म्हणून स्थापित केले आहे.”असोचेमच्या व्दितीय वार्षिक फिनटेक एक्सलन्स सन्मान सोहळ्यात ‘बेस्ट इन क्लास पेमेंट स्टार्टअप इन एस्टॅब्लिश्ड फिनटेक कॅटेगरी’ या पुरस्काराबद्दल आम्हाला सन्मानित करण्यात आलेले आहे. आम्हाला मिळालेला सन्मान हा अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपायांसह डिजीटल पेमेंट जगतात परिवर्तन करण्यासाठी आमचे कर्मचारी घेत असलेले कठोर परिश्रम आणि त्यांची याबाबतची उत्कटतता यांना प्रकाशझोतात आणतो. आम्ही आमच्या ग्राहकांना डिजीटल पेमेंटमध्ये अखंड आणि प्रगत अनुभव प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. हा पुरस्कार आम्हाला नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, तसेच फिनटेक उ‌द्योगात नवनवीन कार्य करत राहण्यासाठी प्रेरणा देतो, अशा शब्दांत फायकॉमर्सचे सह-संस्थापक आणि पेमेंट्स विभागाचे प्रमुख राजेश लोंढे यांनी आपल्या भावना प्रकट केल्या.प्रगतीची नवनवीन शिखरे गाठणे तसेच डिजिटल पेमेंट क्षेत्राला आणखी उत्कृष्टता प्रदान करण्याच्या फायकॉमर्सच्या समर्पणाला या पुरस्कारामुळे आणखी बळकटी मिळाली आहे.

असोचॅम इंडिया इंटरनॅशनल फिनटेक फेस्टिव्हल 2024 मध्ये फाय कॉमर्सला "बेस्ट इन क्लास पेमेंट स्टार्टअप" पुरस्कार
असोचॅम इंडिया इंटरनॅशनल फिनटेक फेस्टिव्हल 2024 मध्ये फाय कॉमर्सला “बेस्ट इन क्लास पेमेंट स्टार्टअप” पुरस्कार
असोचॅम इंडिया इंटरनॅशनल फिनटेक फेस्टिव्हल 2024 मध्ये फाय कॉमर्सला "बेस्ट इन क्लास पेमेंट स्टार्टअप" पुरस्कार