परदेशी शिक्षणातून पुण्याच्या सेवेत; उच्चशिक्षित नेतृत्वाची ओळख – सनी निम्हण
पुणे महानगरपालिकेतील सर्वाधिक उच्चशिक्षित आणि दूरदृष्टी असलेले लोकप्रतिनिधी म्हणून सनी विनायक निम्हण यांची ओळख अधिक ठळक होत आहे. परदेशात उच्च शिक्षण घेऊनही देशात परत येत उद्योग, समाजकारण आणि सार्वजनिक जीवन यांचा समतोल साधणारे सनी निम्हण हे आज औंध–बोपोडी परिसरातील आश्वासक नेतृत्व मानले जात आहेत. त्यांच्या कामाबद्दल मतदारांमध्ये सकारात्मक विश्वास असून, प्रभाग क्रमांक ८ – औंध-बोपोडी येथून भारतीय जनता पक्षाच्या वतीने ते निवडणूक लढवत आहेत.
दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या सामाजिक व राजकीय वारशातून घडलेले सनी निम्हण हे लहानपणापासूनच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे आहेत. एस.एस.पी.एम.एस. आणि मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एमआयटी मधून बी.ई. (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी घेतली. पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांना ऑस्ट्रेलियातील नामांकित मेलबर्न युनिव्हर्सिटीत ‘कन्स्ट्रक्शन अँड प्रॉपर्टी मॅनेजमेंट’ या विषयात एम.एस. साठी स्कॉलरशिपसह प्रवेश मिळाला, ही त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वाची बाब ठरली.शिक्षणाबरोबरच आत्मनिर्भरतेचा धडा त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. परदेशात शिक्षण घेत असताना दैनंदिन खर्चासाठी दररोज चार तास काम करत त्यांनी शिक्षण, अनुभव आणि जबाबदारी यांचा समतोल राखला. शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर त्यांनी घेतलेले एज्युकेशन लोन पूर्णपणे फेडून सामाजिक जाणीव आणि प्रगल्भतेचे दर्शन घडवले.
उच्चशिक्षणानंतर पुण्यात सक्रिय झालेल्या सनी निम्हण यांनी नगरसेवक म्हणून प्रभावी कामगिरी करत विकासाभिमुख नेतृत्वाची छाप उमटवली आहे. शहरी विकास, युवक सक्षमीकरण, महिला उत्थान, उद्योजकता, क्रीडा विकास आणि स्वच्छ शहर ही त्यांची प्राधान्य क्षेत्रे आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग व प्रॉपर्टी मॅनेजमेंटमधील आंतरराष्ट्रीय अनुभवाचा उपयोग करून ते नागरिक-केंद्रित योजना प्रभावीपणे राबवत आहेत.‘विनायकी शिष्यवृत्ती’च्या माध्यमातून सामाजिक भान जपत तर ‘सनीज् वर्ल्ड’द्वारे यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच महा आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आजपर्यंत दीड लाखांहून अधिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य त्यांनी केले आहे. खुले प्रशासन, संवेदनशील दृष्टिकोन आणि परिणामकारक काम हीच सनी निम्हण यांच्या नेतृत्वाची खरी ओळख ठरत आहे.


