गणेश बिडकरांचे महा ई-सेवा केंद्र ठरले नागरिकांसाठी आधार; २७ हजारांहून अधिक नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ
शासकीय सेवा व योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सहज, पारदर्शक आणि जलद पोहोचावा या उद्देशाने माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सुरू केलेल्या महा ई-सेवा केंद्राला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या केंद्राच्या माध्यमातून तब्बल २७ हजारांहून अधिक नागरिकांनी विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेतला आहे.सोमवार व रास्ता पेठ परिसरात कार्यरत असलेल्या या महा ई-सेवा केंद्रांमधून उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ई-श्रम कार्ड, शहरी गरीब कार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ‘टीम बिडकर’च्या कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ व वेगवान झाली आहे.

आतापर्यंत या केंद्राच्या माध्यमातून सुमारे ७,००० विविध दाखले, ४,१७४ आधार कार्ड, ४,००० शहरी गरीब कार्ड, ४,४२९ मतदार ओळखपत्रे तसेच १,८०० ई-श्रम कार्ड नागरिकांना वितरित करण्यात आले आहेत. एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ, पैसा आणि सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात वाचत आहेत.महा ई-सेवा केंद्र प्रशासन आणि नागरिक यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून काम करत असून, गरजू नागरिकांसाठी हे केंद्र खऱ्या अर्थाने आधारवड ठरत असल्याची भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. गणेश बिडकर यांच्या या उपक्रमामुळे ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र दिसून येत आहे.


