Daily UpdateNEWS

पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो-कनेक्टेड व्यावसायिक संकुलाची नवी पायरी गेरा डेव्हलपमेंट्सकडून ‘गेरा’स इम्पेरियम गेटवे’ला थेट मेट्रो प्रवेशमार्ग सुरू

Share Post

पुणे तसेच देश-विदेशात प्रीमियम रिअल इस्टेट प्रकल्पांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गेरा डेव्हलपमेंट्स प्रा. लि. यांनी पिंपरी-चिंचवडमधील ‘गेराज इम्पेरियम गेटवे’ या व्यावसायिक प्रकल्पाला थेट भोसरी मेट्रो स्थानकाशी जोडणारा समर्पित प्रवेशमार्ग सुरू केला आहे. या उपक्रमामुळे हा प्रकल्प शहरातील मेट्रोशी एकात्मिक जोडणी असलेल्या पहिल्या व्यावसायिक संकुलांपैकी एक ठरला आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो-कनेक्टेड व्यावसायिक संकुलाची नवी पायरी गेरा डेव्हलपमेंट्सकडून ‘गेरा’स इम्पेरियम गेटवे’ला थेट मेट्रो प्रवेशमार्ग सुरू

या प्रवेशमार्गाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रॉपर्टी विभागाचे एजीएम मनोज दंडारे, प्लॅनिंग विभागाचे डीजीएम मिहिर कुलकर्णी, तसेच गेरा डेव्हलपमेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलजार मल्होत्रा उपस्थित होते.

नवीन प्रवेशमार्ग सुरू झाल्यानंतर प्रवासी, कर्मचारी आणि व्यावसायिकांना भोसरी मेट्रो स्थानकातून थेट प्रकल्पात प्रवेश मिळणार आहे. यामुळे लास्ट माईल कनेक्टिव्हिटीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असून कार्यालयीन प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि वेळ वाचवणारा ठरणार आहे.

यावेळी मनोज दंडारे म्हणाले की, पुण्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मेट्रो प्रकल्प राबवण्यात आला असून अशा प्रकारचे ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट शहराच्या शहरी रचनेत महत्त्वाचा बदल घडवू शकतात. सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि खासगी विकास यांची प्रभावी सांगड घातल्यास भविष्योन्मुख व्यावसायिक क्षेत्रांची निर्मिती शक्य होते, असेही त्यांनी नमूद केले.

गुलजार मल्होत्रा यांनी सांगितले की, आधुनिक व्यावसायिक प्रकल्प हे केवळ इमारती नसून ते जोडणी, कार्यक्षमता आणि टिकाऊपणा यांवर आधारित असले पाहिजेत. थेट मेट्रो प्रवेशामुळे प्रकल्पाचे व्यावसायिक मूल्य वाढते, कंपन्यांसाठी आकर्षण निर्माण होते आणि पर्यावरणपूरक प्रवासालाही चालना मिळते. त्यांनी पुढे सांगितले की, प्रकल्पातील ९५ टक्क्यांहून अधिक जागांची विक्री झाली असून लीजिंगबाबत कॉर्पोरेट क्षेत्राकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सुमारे ११.५ एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेला ‘इम्पेरियम’ मालिकेतील हा दहावा प्रकल्प तीन इमारतींच्या संकुलात विकसित करण्यात आला आहे. आधुनिक कार्यालयीन जागांसोबतच रिटेल आणि फूड डेस्टिनेशन, सामाजिक संवादासाठी खुला परिसर, दोन स्वतंत्र रिटेल मजले आणि काचांनी सजलेले भव्य प्रवेशद्वार यांमुळे हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडमधील एक महत्त्वाचा बिझनेस-लाईफस्टाईल हब म्हणून विकसित होण्याची अपेक्षा आहे.

याशिवाय, या प्रकल्पातून पुणे-मुंबई-नाशिक कॉरिडॉरशी जोडणी देखील अधिक सुलभ होणार आहे. मेट्रो जोडणीसह साकारलेले हे मॉडेल भविष्यातील शहरी कामकाज पद्धतीचे उदाहरण ठरणार असून ग्राहक-केंद्रित नवकल्पना राबवण्याबाबत कंपनीची भूमिका अधोरेखित करते.

गेरा डेव्हलपमेंट्स प्रा. लि. बद्दल

पन्नासहून अधिक वर्षांची परंपरा असलेली गेरा डेव्हलपमेंट्स ही पुण्यातील अग्रगण्य रिअल इस्टेट कंपनी आहे. कंपनीने पुणे, गोवा, बेंगळुरू आणि कॅलिफोर्निया येथे विविध प्रकल्प विकसित केले आहेत. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, नवकल्पना आणि पारदर्शकता या तत्त्वांवर आधारित कंपनीने भारतात प्रथमच ५ वर्षांची आणि नंतर ७ वर्षांची वॉरंटी, चाइल्डसेंट्रिक होम्स, इंटेलिप्लेक्सेस, स्कायव्हिला आणि ‘इम्पेरियम’ मालिकेसारखे संकल्पना-आधारित प्रकल्प सादर केले आहेत.

कंपनीला विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ संस्थेकडून सलग आठ वर्षे उत्कृष्ट कार्यस्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो-कनेक्टेड व्यावसायिक संकुलाची नवी पायरी गेरा डेव्हलपमेंट्सकडून ‘गेरा’स इम्पेरियम गेटवे’ला थेट मेट्रो प्रवेशमार्ग सुरू
पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो-कनेक्टेड व्यावसायिक संकुलाची नवी पायरी गेरा डेव्हलपमेंट्सकडून ‘गेरा’स इम्पेरियम गेटवे’ला थेट मेट्रो प्रवेशमार्ग सुरू