Daily UpdateNEWS

भारत-इंग्लंड उपांत्य फेरीदरम्यान आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026चा जिओहॉटस्टारवर नवा जागतिक स्ट्रीमिंग विक्रम

Share Post

क्रीडा, प्रसारमाध्यमे आणि स्ट्रीमिंगच्या जगात आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 जागतिक स्तरावर नवनवीन बेंचमार्क स्थापित करत आहे.5 मार्च रोजी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य सामन्यातील डिजिटल प्रेक्षकांच्या संख्येने एक ऐतिहासिक जागतिक टप्पा गाठला आहे.भारत-इंग्लंड उपांत्य फेरीदरम्यान आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026चा जिओहॉटस्टारवर नवा जागतिक स्ट्रीमिंग विक्रम

भारतातील आघाडीचा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टारने या महत्त्वाचा सामन्यादरम्यान अभूतपूर्व 65.2 दशलक्ष प्रेक्षकांची नोंद केली. जगातील कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवरील लाइव्ह इव्हेंटसाठी आतापर्यंत मिळालेली ही सर्वोच्च प्रेक्षक संख्या आहे. या सामन्याला जिओहॉटस्टारवर 619 दशलक्ष व्ह्यूज मिळाले, ज्यामुळे तो आतापर्यंतचा सर्वाधिक स्ट्रीम केलेला टी20 आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे.

या सामन्यात दोन्ही डावांमध्ये मिळून 499 धावा झाल्या. या रोमांचक सामन्याने भारत आणि परदेशातील चाहत्यांची मने जिंकली. मुंबईतील या महत्त्वाच्या सामन्याने नोव्हेंबर 2024 मधील एका आंतरराष्ट्रीय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने स्थापित केलेल्या 65 दशलक्षांच्या आधीच्या जागतिक विक्रमाला मागे टाकले. वास्तविक,  वेगवेगळ्या मार्केटमधील एकत्रित प्रेक्षकसंख्येद्वारे हा आकडा साध्य झाला आहे. तर, दुसरीकडे जिओहॉटस्टारने केलेला हा विक्रम पूर्णपणे एकाच कार्यक्रमाचा होता. यामुळे थेट स्ट्रीमिंगमधील त्यांचे स्थान ठळकपणे स्पष्ट झाले आहे. तसेच लाइव्ह कार्यक्रमाचा आनंद देताना मोठ्या प्रमाणावरील मागणी हाताळण्याची त्याची क्षमता देखील सिद्ध करतो. हा विक्रम भारतीय संघाची लोकप्रियता, उपांत्य फेरी जिंकलीच पाहिजे, ही भावना आणि मोठ्या प्रमाणात चाहत्यांचे प्रेम या सगळ्यांच्या एकत्रीकरणामुळे आयसीसीच्या या स्पर्धेची लोकप्रियता सिद्ध होते.

लिनियर टेलिव्हिजन आणि डिजिटल अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर, उपांत्य फेरी पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 320 दशलक्षांपेक्षा जास्त होती. तर स्क्रीन पाहण्याचा वेळ हा आश्चर्यकारकरित्या 23 अब्ज मिनिटांपेक्षा जास्त होता. यामुळेच तो आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला गेलेला टी20 आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले: “आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना एकत्र आलेले पाहणे खूप आनंददायी आहे. भारत विरुद्ध इंग्लंडच्या उपांत्य सामन्यादरम्यान नोंदवल्या गेलेल्या उल्लेखनीय संख्येवरून केवळ क्रिकेट चाहत्यांचा उत्साहच दिसून येत नाही, तर हा खेळ सर्वांसाठीच सहज उपलब्ध आणि आकर्षक बनवण्यात झालेली प्रगती देखील दिसून येते. हा विश्वचषक जेवढा मैदानावरील खेळासाठी लक्षात राहील तितकाच तो खेळाची भावना साजरी करण्यासाठी एकत्र आलेल्या लाखो चाहत्यांमुळेही लक्षात राहील.” 

जिओस्टारचे उपाध्यक्ष उदय शंकर म्हणाले: “हे जसे जिओस्टारच्या तांत्रिक आणि सर्जनशील उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. तसेच ते क्रिकेटला आणखी मोठे बनवण्याच्या आयसीसीच्या वचनबद्धतेचेही प्रतीक आहे. दर तीनपैकी एका भारतीयाने गुरुवारी झालेला दुसरा उपांत्य सामना पाहिला. आणि जेव्हा लाखो लोक अशा पद्धतीने सामना पाहतात तेव्हा तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर करावा लागतो. मनोरंजनाचे भविष्य असेच असेल.”

दोन्ही संघांच्या आकर्षक खेळाच्या पार्श्वभूमीवर, सामन्यादरम्यान नोंदवल्या गेलेल्या 619 दशलक्ष व्ह्यूजने 2024च्या आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक अंतिम सामन्यादरम्यान नोंदवल्या गेलेल्या 533 दशलक्ष व्ह्यूजच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

अंतिम सामना अजून खेळला जाणे बाकी असताना, आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026ने डिजिटल आणि ब्रॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर आधीच अनेक बेंचमार्क स्थापित केले आहेत.

आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026चा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 8 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळवला जाणार आहे. या संपूर्ण सामन्याचा आनंद प्रेक्षक जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे थेट घेऊ शकतात.