प्रभाग २४ मध्ये गणेश बिडकरांचा ‘विकासरथ’ सुरू; प्रचारात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांच्या नजरा प्रमुख पक्षांकडून उमेदवारी मिळवण्याकडे लागलेल्या आहेत. दुसरीकडे प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठीवर देखील जोर दिला जात आहे. यामध्ये आजच्या आधुनिक काळातील साधनांचा वापर देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल परिसरामध्ये सध्या माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.गणेश बिडकर यांनी नगरसेवक तसेच सभागृह नेते म्हणून काम करताना प्रभागाच्या विकासासाठी केलेल्या विविध विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एलईडी व्हॅन अर्थात ‘विकासरथ’ सुरू केला आहे. या विकासरथाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात करण्यात आला.प्रभाग २४ मध्ये गणेश बिडकरांचा ‘विकासरथ’ सुरू; प्रचारात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

या एलईडी प्रचार रथांच्या माध्यमातून प्रभागात करण्यात आलेली विकासकामे, नागरी सुविधा तसेच आगामी काळातील विकासाचा स्पष्ट अजेंडा नागरिकांसमोर मांडण्यात येणार आहे. पारंपरिक प्रचारपद्धतीला आधुनिकतेची जोड देत विकासकामांचा थेट लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.या प्रसंगी गौरीताई बिडकर, प्रभागाच्या महिला आघाडी अध्यक्षा अनघा दिवाणजी, कल्पनाताई बहिरट, गणेश यादव, देवेंद्र उर्फ छोटू वडके, उद्धव मराठे, लाला दवे, संदीप कडू, योगीराज मालेगावकर, सागर गायकवाड, निखिल बहिरट, राजेंद्र नरवडे, माऊली शिवले, सुनील पाहूजा यांच्यासह प्रभाग क्रमांक २४ मधील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांशी थेट संवाद, विकासकामांची माहिती आणि पुढील विकासाचा स्पष्ट आराखडा मांडत गणेश बिडकर यांनी प्रचारात आधुनिक साधनांचा प्रभावी वापर केल्याने प्रभाग २४ मध्ये ‘विकासरथ’ विशेष आकर्षण ठरत आहे.


