प्रभाग क्रमांक २४ मध्ये गणेश बिडकरांना दक्षिण भारतीय समाजाचा ठाम पाठिंबा
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मधील भाजप उमेदवार गणेश बिडकर यांनी आज सकाळी श्री अय्यप्पा मंदिरात दर्शन घेतले. हे मंदिर केरळमधील साउथ इंडियन समाजासाठी विशेष धार्मिक महत्त्वाचे असून, पुणे शहरातील सर्वात जुन्या दाक्षिणात्य मंदिरांपैकी एक मानले जाते.प्रभाग क्रमांक २४ मध्ये गणेश बिडकरांना दक्षिण भारतीय समाजाचा ठाम पाठिंबा
दर्शनावेळी रस्ता पेठ परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्य करणाऱ्या दक्षिण भारतीय समाजातील नागरिकांनी गणेश बिडकर यांचे उत्स्फूर्त स्वागत केले व त्यांना आपला ठाम पाठिंबा दर्शविला. यावेळी गणेश बिडकर यांनी मंदिरात आरती करून दर्शन घेतले तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी उपस्थित दक्षिण भारतीय नागरिकांनी सांगितले की, “गणेश बिडकर हे आमच्या घरातील कुटुंबीयांसारखे आहेत. कुटुंबातील कोणतेही काम असेल तर त्यांना सांगितल्यानंतर ते तातडीने पूर्ण करतात. मिसेस बिडकर यांनाही कोणतेही काम सांगितले की त्या बहिणीसारख्या धावून येतात आणि काम पूर्ण करतात. म्हणूनच आम्ही त्यांना आमच्या कुटुंबातील एक सदस्य मानतो आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देतो.”
यावेळी मंदिर समितीचे उपाध्यक्ष महेश पोडवाल म्हणाले, “या प्रभागातील श्री अय्यप्पा मंदिरासाठी किंवा समाजासाठी आम्ही कधीही काही मागणी केली, तर गणेश बिडकर यांनी ती नेहमी तातडीने पूर्ण केली आहे. भविष्यातही आमच्या अपेक्षा आहेत आणि त्या ते नक्की पूर्ण करतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे संपूर्ण प्रभागातील दक्षिण भारतीय समाज त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे.”
मंदिर समितीचे सचिव शशांक नायर यांनी सांगितले की, “आरोग्याच्या समस्या असोत वा इतर कोणतीही अडचण, अगदी अर्ध्या रात्रीही गणेश बिडकर यांना मदतीसाठी बोलावले, तर ते त्वरित धावून येतात. अशा समर्पित आणि खऱ्या अर्थाने जनसेवक असलेल्या व्यक्तीसाठी आमचा समाज कायमच मदतीस धावून जाईल आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल.”
दक्षिण भारतीय समाजाचा मिळालेला हा भक्कम पाठिंबा प्रभाग क्रमांक २४ मधील निवडणूक प्रचारात गणेश बिडकर यांना मोठी ताकद देणारा ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.


