Daily UpdateNEWS

मराठी उद्योजकाची जपानमध्ये भरारी; IM कॉर्पोरेशन अधिग्रहित – जागतिक स्तरावर AI आणि तंत्रज्ञान सल्लागार कार्यक्षमतांना बळकटी

Share Post

फिडेलने जपानमधल्या 30 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या IM कॉर्पोरेशन या IT सल्लागार आणि सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनीमध्ये बहुमत हिस्सेदारी संपादित केली. या संपादनामुळे जपानमधील फिडेलच्या स्थानिक सेवा वितरण क्षमतेला बळकटी मिळेल. तसेच जपानी कंपन्यांसाठी फिडेलच्या एंगटरप्राइज IT व AI-चालित सेवांच्या विस्तारास पाठबळ मिळेल.

सुनिल कुलकर्णी, CEO, फिडेल सॉफ्टेक लिमिटेड आणि किकुची-सान, CEO IM कॉर्पोरेशन
फिडेल ने IM कॉर्पोरेशन अधिग्रहित केल्याने भारत आणि-जपान यांच्यामधील सहयोगाला बळकटी मिळाली आहे, परिणामी जपानमधील परिचालन विस्तारण आणि AI-चालित विकासाला बळकटी देणे शक्य होईल.

फिडेल, या जागतिक AI-चालित नेतृत्वाखालील एंटरप्राइझ B2B डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिसेस कंपनीने आज 30 वर्षांहून अधिक इंडस्ट्री अनुभव असलेल्या तसेच जपानमधील तंत्रज्ञान सल्लागार आणि DX सर्व्हिस पुरवणारी IM कॉर्पोरेशन कंपनी अधिग्रहित करण्याची घोषणा केली. या धोरणात्मक संपादनामुळे जपानमधील फिडेलची स्थानिक सेवा वितरण उपलब्धतेला बळकटी मिळाली असून जागतिक विस्तार आणि AI इनोव्हेशन रोडमॅपला चालना मिळाली आहे.

तीन दशकांहून अधिक काळापूर्वी संस्थापित झालेली IM कॉर्पोरेशन ही कंपनी टिअर-1 जपानी सिस्टीम इंटिग्रेटर्स आणि एंटरप्राइझ क्लायंटसाठी फंक्शनल कन्सल्टिंग, एंटरप्राइझ तंत्रज्ञान सेवा आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट सर्व्हिस पुरविण्यामध्ये माहीर आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये IM ने स्व-मालकीच्या न्युरल नॉलेज फ्रेमवर्कचा उपयोग करून AI- साहाय्यक सेवा मॉडेल विकसित करून त्याची अंमलबजावणी केली आहे, ज्यामुळे SI कंपन्यांना वितरण उत्पादकता आणि अनुभवसिद्ध माहितीचा पुनर्वापर सुधारण्याच्या दृष्टीने मदत झाली आहे.

150 पेक्षा जास्त कौशल्यवान व्यावसायिकांच्या टीम आणि जपानच्या एंटरप्राइज इकोसिस्टम तसेच सखोल सांस्कृतिक सुसंगतीसह IM कॉर्पोरेशनने उच्च-गुणवत्तेच्या सल्लागार आणि तंत्रज्ञान सेवा पुरवण्यासाठी चांगला नावलौकिक कमावला आहे. या अधिग्रहणामुळे फिडेलच्या जपानमधील कामकाजाचा विस्तार एकत्रितपणे 200+ व्यावसायिकांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे जपानमध्ये कार्यक्षम ऑनग्राउंड डिलिव्हरी उपलब्ध असलेल्या प्रमुख मूळ-भारतीय SME तंत्रज्ञान सेवा प्रदात्यांपैकी एक ठरली आहे. जागतिक स्तरावर, फिडेल समूहाकडे आता 500+ व्यावसायिक कर्मचारी आहेत, जे विविध भौगोलिक क्षेत्रांमधील क्लायंटना साहाय्य करतात.

या भागीदारीमुळे जपानी व्यवसायांच्या बदलत्या गरजांनुसार तयार केलेल्या AI-चालित सेवा, एंटरप्राइझ सोल्यूशनचे कार्यान्वयन, बायलिंग्वल कन्सल्टिंग, मॅनेज्ड सर्व्हिसेस आणि भाषा स्थानिकीकरण सेवा पुरवण्याच्या फिडेलच्या कार्यक्षमतेमध्ये अधिक सुधारणा झाली आहे. IM कॉर्पोरेशनच्या स्थानिक प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधील कुशल कार्यक्षमता तसेच फंक्शनल कन्सल्टिंगमधील नैपुण्यतेची फिडेलच्या जागतिक तंत्रज्ञान, AI, आणि डिजिटल इंजिनियरिंग क्षमतांबरोबर सांगड घालून क्लायंटसाठी जलद कार्यान्वयन, नाविन्यतेला चालना देणारे परिणाम आणि सुधारित व्यावसायिक तत्परतेच्या माध्यमातून सहकार्य करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

“जपान ही फिडेलसाठी एक धोरणात्मक बाजारपेठ आहे आणि हे संपादन आमच्या जागतिक विकासाच्या वाटेवरचा एक महत्त्वाचा टप्पा आहे,” असे प्रतिपादन फिडेलचे CEO सुनील कुलकर्णी यांनी व्यक्त केले. “IM कॉर्पोरेशनचे जपानी बाजारपेठेविषयी सखोल ज्ञान आणि फिडेलचे IT व AI-आधारित सेवांमधील नैपुण्य यांच्या एकत्रीकरणामुळे जपान आणि त्याबाहेरील क्लायंटना अधिक दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी एक मजबूत पाया तयार झाला आहे. ही भागीदारी म्हणजे गेल्या काही वर्षांत जपानमध्ये आम्ही निर्माण केलेल्या दीर्घकालीन विश्वासाचे आणि हितसंबंधांचे प्रतिबिंब आहे.”

IM कॉर्पोरेशनची लीडरशिप टीम कामकाजामध्ये सक्रिय राहील ज्यामुळे व्यवसाय सातत्याने खात्रीपूर्वक सुरू राहील आणि त्याचबरोबर फिडेलच्या जागतिक डिलिव्हरी मॉडेलशी सुलभपणे इंटीग्रेशन करणे शक्य होईल.
“फिडेल बरोबरच्या भागीदारीमुळे नवप्रवर्तन आणि जागतिक सहकार्यासाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत,” असे प्रतिपादन IM कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व CEO किकुची-सान यांनी व्यक्त केले. एकत्रितपणे, आम्ही आमच्या ग्राहकांना अपेक्षित असलेली गुणवत्ता आणि विश्वास कायम ठेवत, जपानी उद्योगांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि AI-सक्षम सोल्युशन्स पुरवण्यासाठी सुसज्ज आहोत.”

हे संपादन फिडेलच्या व्यापक धोरणाशी सुसंगत आहे, ज्याचा उद्देश कंपनीच्या आंतरराष्ट्रीय डिल्हीवरी क्षमतांचा विस्तार करणे, प्रमुख जागतिक बाजारपेठांमधील कंपनीची उपलब्धता अधिक मजबूत करणे आणि AI-आधारित व अत्याधुनिक IT सेवांमध्ये जोरकसपणे गुंतवणूक करणे हा आहे. 200+ कार्यक्षम कर्मचाऱ्यांची जपानमधील टीम आणि 500+ जागतिक कार्यबलासह विश्वासार्ह क्रॉस-बॉर्डर डिलिव्हरी भागीदार शोधणाऱ्या उद्योगांसाठी AI-नेतृत्वाखालील ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्रॅम्स वाढवण्यासाठी फिडेल धोरणात्मकदृष्ट्या सज्ज आहे.

महत्त्वाचे म्हणजे, हा व्यवहार जपान-भारत SME च्या अद्वितीय यशोगाथेचे प्रतिनिधित्व करतो, ज्यामध्ये सीमा-पार सहकार्य, सांस्कृतिक सुसंगती, आणि दीर्घकालीन हितसंबंध निर्माण करून स्केलेबल जागतिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म कसे तयार केले जाऊ शकतात, हे अधोरेखित केले आहे. या भागीदारीमुळे फिडेल जपानच्या बाजारपेठेतील तज्ज्ञतेवर आधारित विविध क्षमता निर्माण करताना जागतिक AI परिवर्तनाच्या वेगाने होणाऱ्या हालचालीमध्ये अधिक अर्थपूर्णपणे सहभागी होऊ शकतात.

जगभरातील उद्योजक AI, ऑटोमेशन आणि डिजिटल परिवर्तनामध्ये गुंतवणूक वाढवत असताना, फिडेल या अधिग्रहणाचा फायदा घेऊन नवोन्मेष क्षमता वाढवण्याचा, जागतिक क्लायंट सहभाग विस्तृत करण्याचा, आणि विविध उद्योगांमध्ये उच्च-मूल्य AI-चालित सेवा पुरवण्याचा उद्देश ठेवते.

फिडेल सॉफ्टेक लिमिटेड ही एक NSE SME सूचीबद्ध कंपनी आहे, जी जपान-भारत व्यवसायावर लक्ष केंद्रित करते तसेच AI-चालित सेवा, एंटरप्राइझ सोल्यूशनचे कार्यान्वयन, बायलिंग्वल कन्सल्टिंग, मॅनेज्ड सर्व्हिसेस आणि भाषा स्थानिकीकरण सेवा सेवा पुरवते.
फिडेल भांडवल बाजार, उत्पादन, ऑटोमोटिव्ह आणि इंजिनियरिंग सेवा अशा विविध उद्योगांमध्ये काम करतात. इनोव्हेशन, स्केलेबिलिटी आणि ग्राहक यशावर लक्ष केंद्रित करून फिडेल उद्योजकांना डिजिटल स्वीकृती वाढवण्यास आणि शाश्वत विकास साध्य करण्यास सहकार्य करते.

IM कॉर्पोरेशन ही जपानमधील एक टेक कन्सल्टिंग सर्व्हिस कंपनी असून या कंपनीकडे एंटरप्राइझ तंत्रज्ञान निवारणे पुरवण्याचा 30 वर्षांपेक्षा अधिक काळचा अनुभव आहे. ही कंपनी स्थानिक भागातील सखोल तज्ज्ञता, ग्राहकांशी असलेले दीर्घकालीन हितसंबंध, AI सर्व्हिस ऑफरींग आणि गुणवत्ता व विश्वासार्हतेप्रती असलेल्या वचनबद्धतेसाठी ओळखली जाते.