विकासाच्या मुद्द्यावर मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपकडे ओढा; प्रभाग २४ मध्ये राजकीय समीकरणे बदलली
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल या प्रभाग क्रमांक २४ मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अधिक भक्कम होताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या पाठिंब्यामुळे भाजपासाठी प्रभाग २४ मध्ये पोषक वातावरण तयार झाले आहे.विकासाच्या मुद्द्यावर मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपकडे ओढा; प्रभाग २४ मध्ये राजकीय समीकरणे बदलली
निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांतील पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे चित्र दिसत असताना, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या विभाग अध्यक्षांसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेशाच्या वेळी आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, निवडणूक प्रमुख व भाजप उमेदवार गणेश बिडकर यांच्यासह प्रभागातील सर्व उमेदवार व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष विशाल पवार यांच्यासह मनोज गुप्ता, यश मोर, तन्मय पवार, ऋषी सोलंकी, अथर्व टेंबे, साई राऊत, अथर्व उर्फ सोन्या वाघमारे, ऋषी सुकलेजा, राज मोरे, भगवान शिंदे, मंदार पाचोरे, मंदार माळवदकर आणि ओमकार भोसले यांचा समावेश आहे. यांच्यासोबतच अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
हे सर्व पदाधिकारी प्रभागातील सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय होते. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे मनसेच्या प्रभागातील संघटनात्मक रचनेला मोठे खिंडार पडले असून, भाजपाचा विजयमार्ग अधिक सुकर झाला आहे.प्रभाग २४ मध्ये गणेश बिडकर यांनी राबवलेल्या विकासकामांमुळे नागरिकांचा विश्वास दृढ झाला आहे. विकासाच्या मुद्द्यावर समाधानी असलेल्या कार्यकर्त्यांचा कल भाजपकडे वाढत असून, त्यामुळे सर्वच पक्षांतील प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे स्पष्ट होत आहे.या घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक २४ मध्ये भाजप अधिक मजबूत होत असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाची शक्यता अधिक बळावली आहे.


