…याच कारणांमुळे पुणेकर नागरिक मला निवडून देतील – मुरलीधर मोहोळ
जेवढी जास्त मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील. गिरीश बापट यांना सव्वातीन लाखांचे मताधिक्क होते. यांच्यापेक्षा दुप्पट मताधिक्क मोहोळ यांना द्यायचे असेल तर प्रत्येक बुथवर ७५% मतदान होणे व त्यातील ७५% मतदान महायुतीला होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनीदिली. काल महायुतीकडून मोठं शक्तिप्रदर्शन करत मुरलीधर मोहोळ यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी ते बोलत होते. …याच कारणांमुळे पुणेकर नागरिक मला निवडून देतील – मुरलीधर मोहोळ
पुणेकरांमध्ये अतिशय उत्साह असून २०१४ व २०१९ मध्ये जनतेने महायुतीवर विश्वास ठेवला. गिरीश बापट यांनी शहारात चांगले काम केले आणि आता तरूण तडफदार उमेदवार मुरलीधर मोहोळ निवडणुक रिंगणात आहेत. ते प्रचंड मतांनी निवडून येतील. महायुतीमध्ये सर्व काही योग्य पद्धतीने सुरू असून, मागील वेळेपेक्षा जास्त जागा निवडून येतील. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभी आहे. असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे शहराचा पुढील ५० वर्षाचा विचार करून केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने कामे सुरू झाली आहेत. पुणे देशातील प्रथम क्रमांकाचे शहर व्हावे. नागरिकांचे जीवनमान उंचवावे, यासाठी पुढील काळात पुणे शहर नागरिकांचे आणि परिसरात ५० हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. शिक्षणाच्या आणखी चांगल्या संधी निर्माण होणे, नवीन उद्योग आणणे, रोजगारनिर्मिती करणे, पायाभुत सुविधा निर्माण करणे यासाठी ही निवडणुक लढवत असून पुणेकर मला नक्की विजयी करतील असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
