Daily UpdateNEWS

सुतारवाडीत राजकीय हालचालींना वेग! महेश सुतारांच्या भूमिकेमुळे प्रभाग ०९ मध्ये भाजप मजबूत

Share Post

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये राजकीय वातावरण वेगाने बदलताना दिसत आहे. सुतारवाडी परिसरात महेश सुतार हे नाव पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, त्यांच्या हालचालींमुळे भाजपची राजकीय ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र आहे.सुतारवाडीत राजकीय हालचालींना वेग! महेश सुतारांच्या भूमिकेमुळे प्रभाग ०९ मध्ये भाजप मजबूत

गेल्याच आठवड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार असलेले महेश सुतार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या ‘जनसंवाद’ पदयात्रेला सुतारवाडीत मिळालेले जोरदार स्वागत हे राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जात आहे.

स्वराज्य चौक येथून सुरू झालेल्या या पदयात्रेदरम्यान परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला. पदयात्रेच्या मार्गावर उभाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी, जल्लोष आणि मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. या सगळ्या घडामोडींमुळे सुतारवाडीतील राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघाले.

या पदयात्रेदरम्यान महेश सुतार यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. रोहिणीताई चिमटे, श्री. गणेश कळमकर, सौ. मयुरीताई कोकाटे आणि श्री. लहू बालवडकर यांचे भव्य हार घालून जाहीर स्वागत केले. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला मोठे बळ मिळाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

महेश सुतार यांच्या सक्रियतेमुळे प्रभाग क्रमांक ०९ मधील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. सुतारवाडी परिसरात आजही त्यांची वैयक्तिक राजकीय पकड आणि जनाधार मजबूत असल्याचे अलीकडील घटनांमधून स्पष्ट झाले आहे.

‘जनसंवाद’ पदयात्रेदरम्यान केलेले स्वागत हे केवळ औपचारिक नव्हते, तर त्यातून सुतारवाडीत महेश सुतार यांचा प्रभाव, कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्थानिक नेतृत्वाची क्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे पदयात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्यांच्या राजकीय ताकदीचा ठोस पुरावा मानला जात आहे.

सुतारवाडीतील विविध भागांमध्ये महेश सुतार यांनी यापूर्वी केलेल्या स्थानिक विकासकामांचा आणि थेट जनसंपर्काचा प्रभाव आजही दिसून येतो. युवक, स्थानिक व्यावसायिक तसेच काही प्रभावी मतदार गटांमध्ये त्यांचा प्रभाव कायम असून, भाजपमध्ये प्रवेशानंतर प्रभाग ०९ मधील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचे चित्र आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, महेश सुतार यांची ताकद केवळ मतांच्या संख्येपुरती मर्यादित नाही. मतांचे ध्रुवीकरण करण्याची क्षमता त्यांच्याकडे असून, त्यांच्या भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला अतिरिक्त बळ मिळाले आहे. परिणामी, विरोधी गटांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत असल्याचे बोलले जात आहे.

सुतारवाडीत राजकीय हालचालींना वेग! महेश सुतारांच्या भूमिकेमुळे प्रभाग ०९ मध्ये भाजप मजबूत