शॉपर्स स्टॉपतर्फे ‘दिवाळी कलेक्शन’चे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिच्या हस्ते भव्य अनावरण
भारतातील सर्वोच्च फॅशन, सौंदर्य आणि भेटवस्तू मिळण्याचे ठिकाण म्हणून लोकप्रिय असलेल्या शॉपर्स स्टॉप ने पुण्याच्या वाकडमधील फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम येथे दिवाळी संग्रह (दिवाळी कलेक्शन)चे भव्य अनावरण करून सणाचा उत्साह वाढवला.शॉपर्स स्टॉपतर्फे ‘दिवाळी कलेक्शन’चे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिच्या हस्ते भव्य अनावरण

टेलिव्हिजनवरील प्रेक्षक पसंती लाभलेल्या अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने खास मीट अँड ग्रीट साठी ग्राहकांसोबत सहभाग घेत कार्यक्रमाला आणखी उत्साही आणि आकर्षक बनवले.
सणासुदीच्या निमित्ताने दालनाचे रुपांतर रंग, दिवे आणि उत्साही सजावटीने झाले. दिवाळीचा आनंद, आकर्षक सणाचे पोशाख, रुबाबात भर घालणारी असेसरीज्, चमकदार दागिने आणि सौंदर्यप्रसाधने – नवीन ‘दिवाळी कलेक्शन’ प्रत्येक उत्सवाची लकाकी वाढविण्यासाठी तयार करण्यात आले.
शॉपर्स स्टॉप चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ, कस्टमर केअर असोसिएट कवींद्र मिश्रा म्हणाले,
“शॉपर्स स्टॉप हे नेहमीच आमच्या ग्राहकांसाठी खरेदी आणि भेटवस्तूचे गंतव्यस्थान राहिले आहे. या वर्षीचे ‘दिवाळी कलेक्शन’ प्रीमियम ब्रँड, सणासुदीची फॅशन आणि संपूर्ण कुटुंबासाठी विचारशील भेटवस्तू पर्याय एकत्र आणण्याच्या दृष्टीने काळजीपूर्वक तयार करण्यात आले आहे. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने आमच्या वाकड स्टोअरमध्ये कलेक्शनचे अनावरण केले याचा आम्हाला आनंद वाटतो. ज्यामुळे सणासुदीच्या उत्सवात चमक आली आणि पुणे तसेच संपूर्ण भारतातील आमच्या ग्राहकांसाठी हा शुभारंभ आणखी खास झाला.”
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश म्हणाली,
“दिवाळी हा माझा आवडता सण आहे. कारण त्यात प्रकाश, हास्य आणि प्रेमाचा समावेश असतो. शॉपर्स स्टॉप दिवाळी कलेक्शन म्हणजे तुम्ही स्टाईलमध्ये सण साजरा करणे. त्यांचे ‘गिफ्ट्स ऑफ लव्ह’ कलेक्शन तुमच्या प्रियजनांसाठी परिपूर्ण भेटवस्तू सहज उपलब्ध करून देते. हे मोहक, फॅशनेबल आहे. प्रत्येक प्रसंगासाठी काहीतरी आहे. मला चाहत्यांना भेटणे आणि त्यांच्यासोबत हा सणाचा आनंद सामायिक करताना छान वाटले. खरोखरच दालनाच्या आत दिवाळी साजरी झाल्यासारखे वाटले!”
कार्यक्रम उत्सवी जल्लोषाने भरलेला होता. चाहत्यांना तेजस्वीशी संवाद साधण्याची संधी मिळाली, तिने नवीन कलेक्शन पाहिले आणि उपस्थितांना फेस्टिव्ह स्टाईल स्वीकारण्यास प्रोत्साहित केले.
जवळपास ५०० हून अधिक प्रीमियम ब्रँड्स आणि १,२०,००० हून जास्त स्टाईल्ससह, शॉपर्स स्टॉप ग्राहकांना आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट एकाच छताखाली उपलब्ध करून देते – पारंपरिक पोशाख, अॅसेसरीज, घरगुती सजावट आणि सुगंधांपर्यंत.
तुम्ही ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देत असाल किंवा प्रत्यक्ष दुकानातील खरेदीला, शॉपर्स स्टॉप सुलभ खरेदी अनुभव देण्यास वचनबध्द आहे.
➡️ तुमच्या नजिकच्या दालनाला भेट द्या किंवा ऑनलाइन ताजे कलेक्शन आणि खास ऑफर पाहा: www.shoppersstop.com
