नागपंचमीनिमित्त महिलांसाठी आयोजित श्री समर्थ मंगळागौर कार्यक्रम उत्साहात संपन्न
नागपंचमीच्या शुभदिनी महिला एकतेचा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव साजरा करण्यासाठी युवा शेतकरी संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व संस्थापक अध्यक्ष रोहिदास (बाप्पू) अनंता चोरघे यांच्या पुढाकाराने श्री समर्थ मंगळागौर कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.नागपंचमीनिमित्त महिलांसाठी आयोजित श्री समर्थ मंगळागौर कार्यक्रम उत्साहात संपन्न
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रियांका निकम (पीएसआय आंबेगाव पठार), सुरेखाताई काहणे (उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस), गीतांजली ताई जाधव (सत्या फाउंडेशन), राजनंदिनी गव्हाणे (महिला अध्यक्षा रा.मा.सु.स.), रूपालीताई शेवाळे (सामाजिक कार्यकर्त्या), नीलिमाताई पारवडे (प्रसाद महिला बचत गट), योगिता ताई कोंढाळकर (सामाजिक कार्यकर्त्या), कल्पनाताई सोनवणे (सामाजिक कार्यकर्त्या) यांसह मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मंगळागौर प्रथम व द्वितीय गट स्पर्धा तसेच आकर्षक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे मंगळागौर – प्रथम गट
- सौ. आकांक्षा वाडकर
- भारती जगताप
- 3. सिद्धी भालके
मंगळागौर – द्वितीय गट - सौ. साधना निघडे
- नीलिमाताई पारवडे
- स्नेहल मारणे
आकर्षक वेशभूषा – प्रथम गट - सौ. आकांक्षा वाडकर
- सौ. राणी लीम्हण
- सौ. संगीता छविल
आकर्षक वेशभूषा – द्वितीय गट - वर्षा गुजर
- हेमा वाडकर
- योगिता
स्पर्धेतील विजेत्यांना मानाची पैठणी, पैंजण, मामाची नथ, स्मार्टवॉच, हेअर ड्रायर आणि हेअर स्ट्रेटनर यांसारखी आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमाने महिलांना पारंपरिक खेळ, नृत्य, आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची संधी दिली तसेच समाजात एकोपा आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले.
