जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कार्यकर्त्यांचा उत्साह; प्रभाग ०९ मध्ये भाजप आघाडीवर
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ जसजशी जवळ येत आहे, तसतसे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेत प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे. भाजपच्या अधिकृत नगरसेवक उमेदवार सौ. रोहिणी सुधीर चिमटे, श्री. गणेश ज्ञानोबा कळमकर, सौ. मयुरी राहुल कोकाटे आणि श्री. लहू गजानन बालवडकर यांनी भव्य पदयात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा शुभारंभ करत शक्तिप्रदर्शन केले.जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कार्यकर्त्यांचा उत्साह; प्रभाग ०९ मध्ये भाजप आघाडीवर
बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून निघालेल्या या पदयात्रेने संपूर्ण प्रभागाचे लक्ष वेधून घेतले. पक्षाचे झेंडे, घोषणांचा निनाद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांची मोठी उपस्थिती यामुळे परिसरात निवडणुकीचा उत्सव पाहायला मिळाला.
हनुमान मंदिर, राम मंदिर, भैरवनाथ मंदिर, पुणे महानगरपालिका कचरा शाळा, श्री सावतामाळा मंदिर, बालेवाडी फाटा, श्री गणेश मंदिर ते शिवम बालवडकर संपर्क कार्यालय असा या पदयात्रेचा मार्ग होता. वाटेत अनेक ठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त घोषणांच्या माध्यमातून उमेदवारांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना लहू बालवडकर म्हणाले, “हा केवळ प्रचार नाही, तर प्रभाग ०९ च्या विकासाचा संकल्प आहे. स्वच्छता, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, सुरक्षा आणि सुशासन यासाठी ठोस कृती आराखड्यासह आम्ही जनतेसमोर आलो आहोत. आज मिळणारा प्रतिसाद आणि नागरिकांचा विश्वास पाहता विजय निश्चित आहे.”
या प्रचार यात्रेत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांमधील आत्मविश्वास आणि संघटनेची ताकद पाहता प्रभाग ०९ मध्ये भाजपाने निवडणूक रणधुमाळीत आघाडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
स्थानिक नागरिकांनीही या पदयात्रेचे स्वागत करत आपली भावना व्यक्त केली. “फक्त घोषणा नाहीत, तर कामाचा अनुभव उमेदवारांकडे आहे. ते थेट रस्त्यावर उतरून आमच्याशी संवाद साधत आहेत, हीच खरी लोकशाही आहे. यावेळी आम्ही विकासालाच मत देणार,” अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली.
दरम्यान, विरोधक अद्याप निवडणूक रणनीती आखण्यात व्यस्त असताना भाजपने थेट जनतेत उतरून प्रचाराची आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक ०९ मध्ये झालेल्या या भव्य पदयात्रेमुळे निवडणूक लढतीला खऱ्या अर्थाने रंगत आली असून, आगामी दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.


