भाजपाने तिकीट नाकरल्याची चर्चा….सुरेंद्र पठारे ‘घड्याळा’च्या दिशेने?
प्रभाग 3 – विमाननगर–लोहगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे स्थानिक नेते सुरेंद्र पठारे यांच्या संभाव्य राजकीय हालचालींनी पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काही दिवसांपासून पठारे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरात होत्या. मात्र, भाजपाने त्यांना तिकीट नाकारल्याचे समजताच समीकरणे बदलल्याचे संकेत मिळत आहेत.भाजपाने तिकीट नाकरल्याची चर्चा….सुरेंद्र पठारे ‘घड्याळा’च्या दिशेने?
पक्षांतराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, पठारे यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गुप्त बैठक घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीनंतर पठारे आता ‘घड्याळ’ चिन्हाच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता अधिक बळकट झाल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, भाजपात प्रवेशाची चर्चा मार्गी न लागल्याने त्यांनी अजित पवार गटाची सक्रिय संपर्क साधला आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी पठारे यांच्या पुढील रणनीतीकडे पक्षाचे कार्यकर्ते उत्सुकतेने पाहत आहेत.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर सुरेंद्र पठारे यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांचा अंतिम निर्णय काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपाने तिकीट नाकरल्याची चर्चा….सुरेंद्र पठारे ‘घड्याळा’च्या दिशेने?

प्रभाग 3 – विमाननगर–लोहगाव | प्रभाग 4 – खराडी–वाघोली | प्रभाग 5 – कल्याणी नगर–वडगावशेरी
Prabhag 3 – Vimannagar–Lohgaon | Prabhag 4 – Kharadi–Wagholi |Prabhag 5 – Kalyani Nagar–Vadgaonsheri |
SurendraPathare #NCP #SharadPawarGroup #AjitPawar #PunePolitics #PoliticalDevelopments #MaharashtraPolitics #BJP #PartySwitch #PoliticalMovement #NCPPolitics #PuneNews #PoliticalSpeculation #Election2025 #PuneLeader #MaharashtraNews #AjitPawarMeeting #PoliticalShift #PuneUpdates #IndianPolitics #PoliticalBuzz #LocalPolitics
Surendra Pathare, NCP, Sharad Pawar Group, Ajit Pawar, Pune Politics, Maharashtra Politics, BJP, Political Movement, Party Switch, Pune News, Political Developments, Election 2025, Political Speculation, Ajit Pawar Meeting, Pune Leader, Political Shift, Maharashtra News, Indian Politics, Local Politics
