Daily UpdateNEWSPune | NEWS

श्रेयस तळपदे व ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मर्दिनी’ चित्रपटाचा मुहूर्त शॉट संपन्न; सिनेमा २०२६ मध्ये प्रदर्शित होणार

Share Post

श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाच्या मंगल आशीर्वादाने आगामी मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ चा मुहूर्त शॉट उत्साहात पार पडला. या शुभ प्रसंगासह चित्रपटाच्या निर्मिती प्रवासाला अधिकृत सुरुवात झाली असून, दमदार विषय आणि प्रभावी मांडणीसह ‘मर्दिनी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होत आहे.श्रेयस तळपदे व ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मर्दिनी’ चित्रपटाचा मुहूर्त शॉट संपन्न; सिनेमा २०२६ मध्ये प्रदर्शित होणार

श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत असलेल्या या चित्रपटाची कथा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याची, सहनशक्तीची आणि अंतर्गत शक्तीची प्रेरणादायी गाथा मांडते.

“प्रत्येक स्त्री ही मुळात मर्दिनी असते… वेळ आली की ती आपले खरे रूप दाखवते…”
हा विचार ‘मर्दिनी’ चित्रपटाचा मध्यवर्ती आशय आहे.

चित्रपटात मराठी चित्रसृष्टीतील लोकप्रिय आणि दमदार कलाकारांची प्रभावी फळी पाहायला मिळणार आहे. प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांसारख्या अनुभवी कलाकारांसह बालकलाकार मायरा वैकुळ हिचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अनुभवी कलाकारांची ताकद आणि नव्या पिढीची संवेदनशील उपस्थिती यामुळे ‘मर्दिनी’ हा चित्रपट अभिनय आणि मांडणीच्या दृष्टीने वेगळा ठरणार आहे.

या चित्रपटाद्वारे अजय मयेकर यांचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण होत आहे. तर दीप्ती तळपदे या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. ‘मर्दिनी’ हा मराठी चित्रपट २०२६ साली प्रेक्षकांच्या भेटीस मोठ्या पडद्यावर येणार आहे.

श्रेयस तळपदे व ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मर्दिनी’ चित्रपटाचा मुहूर्त शॉट संपन्न; सिनेमा २०२६ मध्ये प्रदर्शित होणार