केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूरमध्ये अधिरा अँड अप्पा कॉफीच्या फ्लॅगशिप कॅफेचे उद्घाटन
मोबिलिटी, हेल्थ, रिअल्टी, लाइफस्टाइल, फूड, सर्व्हिसेस, टेक्नॉलॉजी आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या वेगाने वाढणाऱ्या भारतीय ईबीजी ग्रुपने आपल्या फ्लॅगशिप प्रकल्प अधिरा अँड अप्पा कॉफीचा नागपूरमध्ये विस्तार जाहीर केला आहे. पूनम चेंबर्स, चिंडवाडा रोड, छावणी रोड, बायरामजी टाउन येथे नव्याने सुरू झालेल्या कॅफेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गुरुक्कल डॉ. एस. महेश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूरमध्ये अधिरा अँड अप्पा कॉफीच्या फ्लॅगशिप कॅफेचे उद्घाटन
सुमारे ९०० चौरस फूट क्षेत्रात उभारण्यात आलेले हे कॅफे उत्कृष्ट कॉफी, दर्जेदार अन्न आणि मनमोकळ्या संवादासाठी एक आपुलकीचे ठिकाण म्हणून विकसित करण्यात आले आहे. नागपूर आउटलेटमध्ये दक्षिण भारतीय पारंपरिक चवींना आधुनिक पाश्चिमात्य स्वादांची जोड देणारा खास फ्युजन मेन्यू उपलब्ध आहे. डोसा टॅकोस, मेदू वडा वॅफल्स यांसारख्या नाविन्यपूर्ण पदार्थांसह येथे दिली जाणारी सर्व कॉफी ही अस्सल दक्षिण भारतीय फिल्टर कॉफीवर आधारित आहे, ज्यातून परंपरा आणि गुणवत्तेबाबत ब्रँडची कटिबद्धता दिसून येते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले, “अधिरा अँड अप्पा कॅफे हे परंपरा आणि नवकल्पनांचा उत्तम संगम आहे. स्वदेशी चवींना प्रोत्साहन देत लोकांसाठी सामुदायिक संवादाची ठिकाणे निर्माण करणारे असे उपक्रम स्थानिक उद्योजकता आणि सांस्कृतिक ओळख बळकट करतात. या उपक्रमाच्या देशव्यापी विस्तारासाठी मी संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो.”ईबीजी ग्रुपचे चेअरमन आणि संस्थापक डॉ. इरफान खान यांनी सांगितले की, नागपूरमधील हा शुभारंभ अधिरा अँड अप्पा कॉफीच्या राष्ट्रीय विस्तारातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कोचीपासून सुरू झालेली ही वाटचाल चंदीगड, नाशिक, हैदराबाद आणि आता नागपूरपर्यंत पोहोचली असून, शाश्वतता आणि अस्सलतेच्या तत्त्वांवर आधारित हा ब्रँड जागतिक साखळी कॅफेंना एक भारतीय पर्याय देत आहे
अधिरा अँड अप्पा कॅफेचे सीओओ श्री. करण मेंडन यांनी सांगितले की, “आमच्या कॅफेमधील प्रत्येक कप परंपरा, शाश्वतता आणि नातेसंबंधांची गोष्ट सांगतो. हैदराबादमधील उत्तम प्रतिसादानंतर नागपूरमधील ग्राहकही आमच्या अस्सल अनुभवाला नक्कीच प्रतिसाद देतील, असा आम्हाला विश्वास आहे.”मजबूत सुरुवातीच्या प्रतिसादाच्या जोरावर, ईबीजी ग्रुप मार्च २०२६ पर्यंत ५० हून अधिक नवीन अधिरा अँड अप्पा कॉफी कॅफे सुरू करण्याची योजना आखत असून, डिसेंबर २०२६ पर्यंत भारतभर १०० कॅफे उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पुढील पाच वर्षांत प्रमुख महानगरे आणि टियर-२ शहरांमध्ये देशव्यापी उपस्थिती निर्माण करण्याचा समूहाचा मानस आहे.


