साळेगावकरांच्या वतीने हजारो महिलांना विविध बक्षिसांचे वाटप
वडारवाडी, भैय्यावाडी, पोलिस लाईन परिसरात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग साळेगावकरांच्या वतीने हजारो महिलांना विविध बक्षिसांचे वाटप
शिवाजीनगर, मॅाडेल कॉलनी परिसरातील महिलांसाठी कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने महाभोंडला तसेच भव्य लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस रविंद्र साळेगावकर यांच्या वतीने करण्यात आले होते.

आदिशक्ती जगदंबा माता नवरात्र उत्सव समिती वडारवाडी, वीर नेताजी तरुण मंडळ भैय्यावाडी, अखिल पोलिस लाईन मित्र मंडळ ट्रस्ट या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो महिलांनी सहभाग घेत कार्यक्रमाला रंगत आणली.
कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या महिलांना आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. स्पर्धेत क्रमांक पटकवणाऱ्या महिलांना मानाची पैठणी, मिक्सर, कुकर, तवा, ज्यूसर अशा विविध बक्षिसांनी गौरविण्यात आले. प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
रविंद्र साळेगावकर म्हणाले,
“धावपळीच्या जीवनात महिलांवरती असलेली संसारिक, नोकरी व कामाची जबाबदारी यामुळे महिलांना स्वतःच्या आनंदासाठी वेळ देता येत नाही. महिलांनी त्यांच्या आवडी, निवडी, छंद जोपासावेत, विविध ठिकाणी राहणाऱ्या महिला खेळाच्या माध्यमातून एकत्र आल्या, एकमेकींच्या ओळखी झाल्या आणि बक्षिस मिळवत त्या आनंदात घरी परतल्या — हा सोहळा सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरतो.”
या विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात कल्पेश मोरे, सुरज जोशी, अनिता शहाणे, वैजयंती सोळवे, हर्षनील शेळके, किरण ओरसे, राजेश नायडू यांच्यासह परिसरातील हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.


साळेगावकर | Ravindra Salegaonkar | BJP Pune | कोजागरी पौर्णिमा | Mahabhondla Pune | Women Empowerment | वडारवाडी महिला कार्यक्रम | भैय्यावाडी | पोलिस लाईन | Pune Events | महिला सक्षमीकरण | Mahila Bhet | लकी ड्रॉ कार्यक्रम | Shivajinagar Pune | Pune Social Event | BJP Women Event Pune