झेनडेस्कने पुण्यात उभारले इनोव्हेशन हबजागतिक उत्पादन विकासाचे नेतृत्व करण्यासाठी ‘ग्लोबल कॅपेबिलिटीज सेंटर’ सज्ज
झेनडेस्कने आज पुण्यात संशोधन आणि विकासासाठी (आर अँड डी) ‘इनोव्हेशन हब’च्या उद्घाटनाची घोषणा केली. ही घोषणा कंपनीच्या भारतातील विस्ताराच्या तसेच जागतिक उत्पादन विकास टीमच्या वाढीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. प्रतिभेचे नवीन स्रोत वाढवणे आणि जागतिक टीम्समधील समन्वय बळकट करणे, या झेनडेस्कच्या धोरणाचा एक भाग म्हणून झेनडेस्क पुणे इनोव्हेशन हब (‘पुणे हब’ किंवा ‘हब’) स्थापन करण्यात आले आहे. पुणे आता कंपनीच्या जागतिक विकास केंद्रांपैकी एक बनले असून, जगभरातील कामकाजाचा भाग म्हणून या टीमचा आकार आणि महत्त्व अधिक वाढणार आहे.
झेनडेस्कच्या रिझोल्यूशन प्लॅटफॉर्मवर केंद्रित असलेल्या एआय-सक्षम (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) सोल्यूशन्समध्ये कंपनीचे नेतृत्व अधिक भक्कम करण्यात झेनडेस्कचे पुणे हब महत्त्वाची भूमिका बजावेल. पुणे हब एक परिपूर्ण इनोव्हेशन केंद्र म्हणून काम करते. यामध्ये प्रॉडक्ट मॅनेजमेंट, युएक्स डिझाईन, इंजिनिअरिंग आणि सर्व्हिस रिलायबिलिटी इंजिनिअर्स यांसारख्या विविध विभागांचा समावेश आहे. हे विभाग या हबला स्वतंत्र आणि संपूर्ण जबाबदारीसह जागतिक स्तरावरील योजना (रोडमॅप) राबवण्यासाठी सक्षम करतात. ही टीम कोअर क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लॅटफॉर्म सर्व्हिसेसपासून ते अद्ययावत ॲप्लिकेशन लेयरपर्यंतच्या संपूर्ण टेक्नॉलॉजी स्टॅकमधील महत्त्वपूर्ण विभागांची जबाबदारी सांभाळते. या हबचे मुख्य लक्ष झेनडेस्कच्या ‘एजंट आणि ॲडमिन वर्कस्पेसेस’च्या धोरणात्मक विकासावर आहे, जे आमच्या वाढत्या एम्प्लॉयी सर्व्हिस (ईएस) सुविधेचा अत्यावश्यक पाया आहेत.
“एआयच्या वेगाने बदलणाऱ्या या जगात नावीन्याचे स्वरूप दररोज बदलत आहे आणि आमच्या पुणे इनोव्हेशन हबची स्थापना ही धोरणात्मक गती दर्शवते. ही टीम चपळता आणि विस्तारासाठी तयार करण्यात आली असून, यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक वेगाने महत्त्वपूर्ण आणि अद्ययावत सुविधा देऊ शकू,” असे झेनडेस्कचे प्रॉडक्ट, इंजिनिअरिंग आणि एआय विभागाचे अध्यक्ष शशी उपाध्याय म्हणाले. ते पुढे म्हणाले, “भारत आता केवळ एक सपोर्ट हब राहिलेला नसून तो नावीन्याचे एक धोरणात्मक इंजिन बनला आहे. या केंद्राच्या स्थापनेद्वारे, आम्ही केवळ अंमलबजावणीच्या पलीकडे जाऊन जागतिक प्रॉडक्ट रोडमॅपची संपूर्ण जबाबदारी आणि मालकी घेत आहोत. तसेच, ही सुविधा आमच्या स्मार्ट जागतिक विस्ताराचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे, जी जगभरात एआय-आधारित उत्कृष्ट सेवा पुरवण्याच्या आमच्या जागतिक दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी आवश्यक असणारी उच्च-स्तरीय समन्वयाची जागा प्रदान करते.”
पुणे हबमध्ये सध्या जवळपास 300 कर्मचारी काम करत आहेत. 2026 च्या अखेरीस या टीममध्ये आणखी 15% वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यतः इंजिनिअर्सचा समावेश असलेली ही पुण्यातील टीम भारतातील सेल्स आणि सपोर्ट प्रोफेशनल्सच्या टीमला पूरक म्हणून काम करते. ही टीम बीटूबी टेक, रिटेल, ई-कॉमर्स आणि ट्रॅव्हल यांसारख्या विविध क्षेत्रांतील आघाडीच्या ब्रँड्ससोबत काम करणाऱ्या झेनडेस्कच्या ग्राहकांना सेवा देते. सेवेची कार्यक्षमता वाढवणे, वाढीला चालना देणे आणि जगभरातील व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी सक्षम करणाऱ्या नाविन्यपूर्ण सोल्यूशन्सला पाठिंबा देण्यामध्ये झेनडेस्कचे पुणे हब महत्त्वपूर्ण जागतिक भूमिका बजावेल.
या टीमचे नेतृत्व सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष विनोद शाह करत आहेत. स्केलेबल आणि ग्राहक-केंद्रित सॉफ्टवेअर उत्पादने तयार करण्यावर लक्ष केंद्रित करून, कल्पनेपासून ते लाँचपर्यंतच्या उत्पादन विकास चक्राच्या सर्व टप्प्यांचे नेतृत्व करण्याचा 24 वर्षांपेक्षा जास्त इंजिनिअरिंगचा अनुभव घेऊन ते झेनडेस्कमध्ये दाखल झाले आहेत.
पुण्यात हब असल्याच्या फायद्यांवर बोलताना शाह म्हणाले, “आमचे जागतिक आर अँड डी केंद्र पुण्यात असल्यामुळे, आमचे स्थानिक ग्राहक आणि जीटीएम टीम्सना सिस्टीम तयार करणाऱ्या लोकांशी थेट संपर्क साधता येतो, तर आमच्या डेव्हलपर्सना वास्तविक जगातील कार्यपद्धती आणि ग्राहकांच्या आव्हानांबद्दल थेट माहिती मिळते. या जवळीकीमुळे आम्हाला एक उत्कृष्ट ग्राहक सेवा प्लॅटफॉर्म तयार करण्याची संधी मिळते, जो जागतिक स्तरावर विस्तारलेला असला तरीही स्थानिक पातळीवर सुसंगत आहे.”
पुण्यातील ही टीम ‘अबील बुलेव्हार्ड’मधील एका अत्याधुनिक कार्यालयातून काम करते, जे नावीन्य, कल्पकता आणि समन्वय वाढवण्यासाठी डिझाईन केलेले आहे.


