कलर्स मराठी ने वापरला चक्क सोनी मराठी चा प्रोमो
सध्या मलिकांच्या जगात एक वेगळी चढाओढ पाहायला मिळत आहे. नव्या मालिका नवे एपिसोड व महा एपिसोड यांची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पण कालच एक आगळीवेगळी गोष्ट घडली कलर्स मराठी वाहिनीने चक्क सोनी मराठी वाहिनीच्या प्रोमोचा वापर केला. तो देखील जाणून. त्यांनी प्रोमो सोनी वाहिनीचा वापरला आणि आपल्या मालिकेचे प्रमोशन केले. सोनी मराठीचे कलाकार यात झळकले आणि हा असा प्रोमो वापरणं हे फार ह्ष्यास्पद बाब आहे. सोनी मराठीवरील रंगपंचमी महासंगम चा हा प्रोमो कलर्स मराठी ने आपल्या नव्या मालिकेसाठी वापरला. सोनी मराठीवरील हा रंगपंचमी महासंगम येत्या २५ मार्च ला असणार आहे. यात सोनी मराठीवरील सगळ्या मालिकांतील कलाकार यामध्ये एकत्रित येऊन धमाल करताना दिसणार आहेत. पण आजच्या या टेकनॉलॉजी चा वापर करुन सोनी मराठी च्या प्रोमो चा वापर करुन कलर्स वहिनीने चक्क त्यांचा मालिकेचे प्रमोशन करण्याचा फसलेला प्रयत्न केला. त्या शिवाय त्यांनी विविध सोशल मीडिया माध्यमांवर देखील हा प्रोमो शेयर करत याचा अभिमान देखील बाळगला. आता असा हा टेकनोलॉजी चा गैरवापर अजून कसा आणि कुठे होणार हे आपल्याला पाहायला मिळेल
