Daily UpdateNEWSPune | NEWS

माणुसकीचा हात फाऊंडेशनचे महिला सक्षमीकरण योगदान भविष्याची वाटचाल करण्यास प्रेरणादायी : अल्पनाताई वरपे

Share Post

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “माणुसकी हिच खरी सेवा” हे ब्रीदवाक्य जपत कार्यरत असलेल्या माणुसकीचा हात फाऊंडेशनच्या वतीने समाजातील विविध स्तरांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान प्रेरणादायी असून, अशा रणरागिणींच्या कार्यामुळे इतर महिलांनाही पुढे येण्यासाठी प्रोत्साहन मिळते, असे मत पुणे महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अल्पनाताई गणेश वरपे यांनी व्यक्त केले.

माणुसकीचा हात फाऊंडेशनचे महिला सक्षमीकरण योगदान भविष्याची वाटचाल करण्यास प्रेरणादायी : अल्पनाताई वरपे

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित आदर्श महिला गौरव पुरस्कार २०२६ वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केल्यानंतर त्या इतर महिला भगिनींसाठी प्रेरणास्त्रोत ठरतात, असेही त्यांनी सांगितले. विशिष्ट हेतूने आपल्या-आपल्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या महिलांचा सन्मान हा केवळ वैयक्तिक गौरव नसून संस्थात्मक आणि उद्दिष्टपूर्तीच्या कार्याचाही गौरव असतो, असे त्या म्हणाल्या.

आज समाजात असंख्य महिला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. अशा वेळी माणुसकीचा हात फाऊंडेशनसारखी समाजसेवी संस्था त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान करून त्यांना नवी ऊर्जा देण्याचे काम करत आहे, असे अल्पनाताई वरपे यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये सौ. मधुराताई वाचल यांना आदर्श महिला फूड ब्लॉगर पुरस्कार (मधुराज किचन), सौ. निकिता मनोज शिंगुस्ते यांना आदर्श महिला रीलस्टार पुरस्कार, सौ. अंजू बाळासाहेब माने यांना आदर्श महिला कृतज्ञता पुरस्कार, अॅड. डॉ. रोहिणी पवार यांना आदर्श महिला वकील पुरस्कार, सौ. मनिषा राजेंद्र खेडेकर यांना आदर्श माता पुरस्कार, सौ. तेजस्विनी सावंत आणि कु. मयुरी रोकडे यांना आदर्श महिला खेळाडू पुरस्कार, प्रा. सौ. शोभा वाघमोडे यांना आदर्श महिला वैज्ञानिक पुरस्कार, कु. तृप्ती शाम निंबळे यांना आदर्श महिला बॉक्सिंग खेळाडू पुरस्कार, सौ. श्रुती वैभव कढणे यांना आदर्श महिला पोलिस पुरस्कार, सौ. वैशाली विभीषण शिवडे यांना आदर्श महिला वकील पुरस्कार, श्रीमती आकांक्षा देवभानकर यांना आदर्श महिला योग शिक्षिका पुरस्कार, सौ. सीमा वाघमोडे यांना आदर्श महिला समाजसेविका पुरस्कार, सौ. वंदना बजरंग प्रक्षाळे यांना आदर्श महिला शिक्षिका पुरस्कार, सौ. वर्षा कसबे यांना आदर्श महिला पोलिस अॅडमिन पुरस्कार, तसेच सौ. नलिनी गायकवाड, सौ. अमृता उतेकर आणि सौ. भाग्यश्री निढाळकर यांना आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार प्रदान करण्यात आले. सौ. शिवानी पांढरे यांना आदर्श महिला पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या सर्व पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मान अल्पनाताई गणेश वरपे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सौ. वंदना प्रक्षाळे मॅडम यांना आदर्श महिला शिक्षिका पुरस्कार मिळाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक श्री. बाळासाहेब भालेराव, अध्यक्षा सौ. सुरेखाताई इंगळे, सचिव सौ. आरतीताई केतन तेंडले, तसेच श्री. भीमराव रणसिंग, श्री. शिवाजी ओव्हाळ, श्री. बाळासाहेब आंग्रे, सौ. शीतलताई सरोदे आणि फाऊंडेशनच्या इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

तसेच श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण करण्यात आल्यामुळे या कार्यक्रमाबाबत अनेकांच्या मनात विशेष उत्सुकता निर्माण झाली होती.

माणुसकीचा हात फाऊंडेशनचे महिला सक्षमीकरण योगदान भविष्याची वाटचाल करण्यास प्रेरणादायी : अल्पनाताई वरपे
माणुसकीचा हात फाऊंडेशनचे महिला सक्षमीकरण योगदान भविष्याची वाटचाल करण्यास प्रेरणादायी : अल्पनाताई वरपे