
गोदरेज प्रॉपर्टीज: ‘द एलिव्हेटेड लिव्हिंग एडिट’ पुणे आवृत्तीचे अनावरण
भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने (GPL) आज पुण्यातील घर खरेदीदारांच्या बदलत्या आकांक्षांवर प्रकाश टाकणाऱ्या ‘द एलिव्हेटेड लिव्हिंग एडिट’ (The Elevated Living Edit) च्या पुणे आवृत्तीचे प्रकाशन केले. पुण्यातील म्हाळुंगे येथील ‘गोदरेज हिल रिट्रीट’मध्ये आयोजित ‘शुभ आरंभ’ या विशेष गृहहस्तांतरण कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अहवाल सादर करण्यात आला.गोदरेज प्रॉपर्टीज: ‘द एलिव्हेटेड लिव्हिंग एडिट’ पुणे आवृत्तीचे अनावरण
या अभ्यासानुसार, पुण्यातील आलिशान जीवनशैलीची व्याख्या आता केवळ घराचा आकार किंवा पत्ता यापुरती मर्यादित राहिलेली नाही; तर ते घर खरेदीदारांना कशा प्रकारची जीवनशैली आणि आरोग्यदायी वातावरण देते, यावर अधिक अवलंबून आहे.
पुण्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम घर खरेदीदारांची नवी पसंती खालीलप्रमाणे आहे:
- ७४% ग्राहकांची ‘वेलनेस’ (आरोग्य व कल्याण) सुविधांना सर्वाधिक पसंती.
- ७८% ग्राहकांना योगा आणि ध्यानासाठी घरात स्वतंत्र जागा हवी आहे.
- ७६% ग्राहकांची मोठ्या बाल्कनीला पसंती, तर ७२% लोकांचा आसपास हिरवळ आणि पर्यावरणपूरक वातावरणावर भर.
- ६८% लोक सामाजिक (community-centric) जीवनशैलीला आणि ६७% लोक मनोरंजनात्मक सुविधांना महत्त्व देतात.
- ६४% लोक शाश्वत (sustainable) वैशिष्ट्यांची आणि ६०% लोक ‘स्मार्ट होम’ तंत्रज्ञानाची अपेक्षा ठेवतात.
- ७९% ग्राहकांनी पुण्यातील निवासी रिअल इस्टेट बाजारपेठेत पुन्हा गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या कार्यक्रमात गोदरेज प्रॉपर्टीजचे पश्चिम-पूर्व विभागाचे सीईओ मयंक पोद्दार आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्यात एक विशेष संवाद रंगला, ज्याचे सूत्रसंचालन गोदरेज इंडस्ट्रीजचे मुख्य संचार अधिकारी सुजित पाटील यांनी केले.
मयंक पोद्दार, सीईओ (पश्चिम-पूर्व विभाग), गोदरेज प्रॉपर्टीज:
“भारतातील सर्वात गतिमान निवासी बाजारपेठांमध्ये पुण्याचा समावेश आहे. ‘एलिव्हेटेड लिव्हिंग एडिट’ हे आजच्या घर खरेदीदारांच्या प्राधान्यक्रमांमधील महत्त्वपूर्ण बदलाचे प्रतिबिंब आहे. आता पुण्यात आरामदायी जगण्याची व्याख्या आरोग्य, अर्थपूर्ण सामुदायिक अनुभव, निसर्गाशी जवळीक आणि शाश्वतता यावर ठरते. आर्थिक वर्ष २०२७ च्या अखेरपर्यंत पुण्यात ४,००० हून अधिक घरे वितरित करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत, जे आमच्या उत्कृष्टतेची आणि ग्राहक समाधानाची ग्वाही देते.”
मृणाल ठाकूर, सुप्रसिद्ध अभिनेत्री:
“गोदरेज हिल रिट्रीट येथील ‘शुभ आरंभ’ कार्यक्रमाचा भाग होता आले, याचा मला आनंद आहे. पुण्यातील ७८% घरखरेदीदार योग आणि ध्यानासाठी स्वतंत्र जागा असण्याला महत्त्व देतात, हे जाणून खूप छान वाटले. आधुनिक जीवनशैलीत ‘वेलनेस’ला किती महत्त्व प्राप्त झाले आहे, हे यातून सिद्ध होते. मार्च २०२७ पर्यंत ४,००० घरे पूर्ण करण्याची गोदरेज प्रॉपर्टीजची वाटचाल अत्यंत प्रेरणादायी आहे.”
अहवालातील निष्कर्षांशी सुसंगत अशी जीवनशैली देण्यासाठी, गोदरेज प्रॉपर्टीजने पुण्यातील पहिल्या रिसॉर्ट-शैलीतील प्रकल्पात—गोदरेज हिल रिट्रीट येथे १४०० चौ.मी. क्षेत्रातील ‘इको-रिसॉर्ट’ संकल्पनेवर आधारित भव्य क्लब हाऊसचे अनावरण केले आहे.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:
- ४ विशेष विभाग: किड्स कार्निव्हल झोन, स्प्लॅश एरिना, रिसॉर्ट रूफ एरिना आणि ट्रँक्विल झोन.
- ७ संकल्पना-आधारित उद्याने.
- पुण्यातील निवासी प्रकल्पातील पहिली कार्यान्वित ‘बोलिंग अॅली’.
- अत्याधुनिक ‘इंटरअॅक्टिव्ह जिम’ आणि उच्च दर्जाच्या वेलनेस सुविधा.
- सक्रिय आणि अनुभवांवर आधारित जीवनशैलीसाठी डिझाइन केलेल्या २५ हून अधिक रिसॉर्ट-शैलीतील सुविधा.

