Daily UpdateLaunchNEWS

पुणे कॅम्पमध्ये ‘सिल्व्हर मोटर्स – निसान’च्या नव्या भव्य शोरूमचे शानदार उद्घाटन

Share Post

पुण्यातील ऑटोमोबाईल क्षेत्रात १९३५ पासून विश्वासार्ह नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिल्व्हर जुबिली ग्रुप अंतर्गत कार्यरत सिल्व्हर मोटर्स – निसान या नव्या अत्याधुनिक शोरूमचे पुणे कॅम्प येथे भव्य उद्घाटन पार पडले.या शोरूमचे उद्घाटन Nissan Motor India चे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी निसान मोटर इंडियाचे डायरेक्टर अभिषेक अरोरा, विवेक पल्लिवाल, राकेश नेगी, मृन्मय गोगोई तसेच निसानची संपूर्ण टीम उपस्थित होती.

.🏁 निसानचा भारतातील वारसाभारतामध्ये निसानची उपस्थिती १९६५ पासून असून, भारतीय सैन्याने विश्वास ठेवत निसान पॅट्रोल ६० (जोंगा) या वाहनाची निवड केली होती. विविध युद्ध मोहिमांमध्ये या वाहनाने आपली विश्वासार्हता सिद्ध केली असून, निसान ब्रँड आजही गुणवत्तेचे आणि टिकाऊपणाचे प्रतीक मानला जातो.🏢 सिल्व्हर जुबिली ग्रुपचा वारसासिल्व्हर जुबिली ग्रुपचा वारसा १९३५ पासून पुणे कॅम्प परिसरात पेट्रोल पंप, कार शोरूम आणि सर्व्हिस स्टेशनच्या माध्यमातून मजबूतपणे रुजलेला आहे.हा नवा प्रकल्प सिल्व्हर मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक सौ. राजवर्धिनी संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आला आहे.

या उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. त्यामध्ये:आमदार रवींद्र चव्हाणराजेश पांडेआमदार संजय जगतापखासदार अशोकअण्णा मोहोळआमदार संग्रामदादा थोपटेआमदार दिलीपराव मोहितेआमदार रमेशअप्पा थोरातआमदार अशोकराव पवारआमदार अतुल बेनकेआमदार सुनील कांबळेतसेच विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरयाशिवाय पीडीसीसी बँक, संत सोपानकाका सहकारी बँक आणि इतर संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.