पुणेकरांसाठी ‘पॉपाईज इंडिया’ची खास मेजवानी; शहरात तीन नवीन स्टोअर्स सुरू
ज्युबिलंट फूडवर्क्स लि. या भारतातील आघाडीच्या फूड सर्व्हिस कंपनीने पुण्यात पॉपाईज®️ या ब्रॅंडची तीन नवीन रेस्टॉरंट्स सुरू केली आहेत. कंपनीने आज ही घोषणा केली. भारतातील वेगाने वाढणाऱ्या आणि उच्च क्षमता असलेल्या खाद्यपदार्थांच्या बाजारपेठेत पॉपाईज®️ या ब्रँडचा प्रवेश होत आहे. प्रमुख शहरांकडे लक्ष केंद्रित करीत आणि ग्राहकांची बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेत पॉपाईज®️ सातत्याने विस्तार करीत आहे.
मे महिन्यात सुरू होणारी ही तीन रेस्टॉरंट्स विमाननगरमधील फिनिक्स मार्केट सिटी, मगरपट्टा येथील सीझन्स मॉल आणि पिंपरी-चिंचवड येथील एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल अशा पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी उघडली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख निवासी आणि व्यावसायिक भागांमध्ये ग्राहकांना पॉपाईज®️ सहज उपलब्ध होणार आहे.तरुण आणि आधुनिक जीवनशैली असलेली लोकसंख्या, मोठा विद्यार्थीवर्ग आणि वाढत्या काम करणाऱ्या तरूण व्यावसायिक वर्गामुळे पुणे हे वारंवार बाहेर खाण्याची आवड असलेले महत्त्वाचे शहर बनले आहे. जागतिक दर्जाच्या क्यूएसआर (क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट) ब्रँड्ससाठी येथे ग्राहकांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांच्या बदलत्या आवडी-निवडी लक्षात घेऊन पॉपाईज आता आपल्या खास ‘लुइसियाना’-स्टाइलच्या चवी पुणेकरांसाठी घेऊन येत आहे.पॉपाईज हा ‘लुइसियाना’ येथे सुरू झालेला जागतिक स्तरावर प्रसिद्ध ब्रँड आहे.
आपल्या मसालेदार आणि चविष्ट फ्राईड चिकनसाठी तो ओळखला जातो. त्यांची खास रेसिपी १२ तास मॅरिनेट केली जाते आणि त्यात खास कॅजून मसाल्यांचा वापर केला जातो. त्यामुळे जगभरातील ग्राहकांमध्ये या ब्रँडची मोठी लोकप्रियता आहे. ‘पॉपाईज’च्या प्रसिद्ध चिकन सॅंडविचमुळे या ब्रँडला जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली होती. बाजारात सादर झाल्यानंतर या सँडविचला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. बंगळुरू, चेन्नई, दिल्ली एनसीआर, पंजाब आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये यश मिळवल्यानंतर आता पॉपाईज आपल्या खास डिशेस पुण्यातही घेऊन येत आहे.ज्युबिलंट फूडवर्क्स लि.चे पॉपाईज ब्रॅंडसाठीचे कार्यकारी उपाध्यक्ष व चीफ बिझनेस ऑफिसर विभोर गुप्ता यांनी ‘पॉपाईज’च्या सादरीकरणाबाबत आनंद व्यक्त करताना म्हटले, “पुण्यात पॉपाईज सुरू करण्याबाबत ग्राहकांकडून खूप चौकशी होत होत्या. त्यामुळे आता पॉपाईज सादर करताना आम्ही खूप उत्साहित आहोत.
सुरुवातीला आमची तीन स्टोअर्स सुरू होत आहेत. यापुढे आणखी अनेक स्टोअर्स सुरू करण्याची आमची योजना आहे. तरुण, प्रवासाची आवड असलेले आणि वेगळ्या तसेच चविष्ट खाद्यपदार्थांचा शोध घेणारे ग्राहक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुणे हे आमच्यासाठी मोठी क्षमता असलेले मार्केट आहे. भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ‘पॉपाईज’चा विस्तार करण्याच्या दृष्टीने पुण्यातील ही सुरुवात एक धोरणात्मक टप्पा ठरणार आहे.”पुण्यातील ‘पॉपाईज’च्या मेन्यूमध्ये ग्राहकांच्या आवडीचे अनेक लोकप्रिय पदार्थ उपलब्ध असतील. यामध्ये प्रसिद्ध सिग्नेचर चिकन, स्पायसी कोरियन आणि स्वीट चिली यांसारख्या बोल्ड फ्लेवर्ससह ‘हॉट अॅंड मेसी’ रेंज सादर करण्यात आली आहे. तसेच फ्लेवर-बर्स्ट बर्गर्स, काजून चिकन टेंडर्स, चिकन पॉपकॉर्न आणि प्रसिद्ध चिकन सँडविच यांचा समावेश असेल. याशिवाय शाकाहारी ग्राहकांसाठीही विविध पर्याय उपलब्ध असतील. त्यात फ्लेवर-बर्स्ट व्हेज बर्गर रेंज, रॅप्स, काजून फ्राईज आणि क्रिस्पी अनियन रिंग्स यांसारखे पदार्थ असतील. विविध चवी आणि आवडी लक्षात घेऊन हा मेन्यू तयार करण्यात आला आहे.
पॉपाईज सादर होतानाचे एक खास आकर्षण म्हणजे ‘डिप एन’ ड्रिप’ रेंज. या नव्या सॉसच्या रेंजमध्ये चार वेगवेगळ्या चवींचे ‘सिग्नेचर सॉस’ १०० मि.ली. आणि ३०० मि.ली. पॅकमध्ये उपलब्ध असतील. ग्राहकांना आपल्या आवडीनुसार पदार्थांसोबत हे सॉस डिप करून किंवा मिसळून खाता यावेत आणि इतरांसोबत सहज शेअर करता यावेत, यासाठी ही रेंज खास तयार करण्यात आली आहे. यामुळे ‘पॉपाईज’चा खास स्वाद एका पदार्थापुरता मर्यादित न राहता अधिक व्यापक अनुभव देणार आहे.पॉपाईज आता पुण्यात प्रवेश करत असून, आपल्या जागतिक स्तरावर लोकप्रिय आणि दमदार चवीच्या पदार्थांद्वारे नव्या ग्राहकवर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. “वर्ल्ड फेमस चिकन, लव्हड बाय मिलियन्स… पुण्यात पॉपाईज!” या घोषवाक्यासह हा ब्रँड पुण्यात पदार्पण करत आहे. ‘लुइसियाना’ परंपरेची ओळख कायम ठेवत स्थानिक ग्राहकांशी मजबूत नाते निर्माण करण्याचा पॉपाईजचा उद्देश आहे. या निमित्ताने पुण्यातील ग्राहकांसाठी दोन आठवड्यांची खास प्रारंभीची ऑफरही उपलब्ध असणार आहे. या विस्ताराच्या माध्यमातून पॉपाईज भारतातील प्रमुख शहरांमध्ये आपला व्यवसाय अधिक वाढवत असून, पुण्यातही आपले ठोस स्थान निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.


