Daily UpdateLaunchNEWSPune | NEWS

पुनावळेत ‘NIA EV Motors’ इलेक्ट्रिक दुचाकी शोरूमचे शानदार उद्घाटन

Share Post

पुनावळे येथे ‘NIA EV Motors’ च्या भव्य इलेक्ट्रिक दुचाकी एक्सपीरियन्स सेंटरचे उद्घाटन पुनावळेत ‘NIA EV Motors’ इलेक्ट्रिक दुचाकी शोरूमचे शानदार उद्घाटन

इंधनाची बचत आणि पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक दुचाकी काळाची गरज : आमदार शंकर जगताप

पुनावळेत ‘NIA EV Motors’ इलेक्ट्रिक दुचाकी शोरूमचे शानदार उद्घाटन

पुनावळे (पिंपरी-चिंचवड): वाढत्या इंधनाच्या किमतींवर मात करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक प्रवासाला गती देण्यासाठी नागरिकांनी इलेक्ट्रिक दुचाकींचा (Electric Two-Wheelers) वापर वाढवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी केले.

पुनावळे येथे ‘NIA EV Motors’ च्या अत्याधुनिक आणि केवळ ई-बाईक्ससाठी समर्पित असलेल्या ‘NIA EV Experience Center’ चे भव्य उद्घाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते फित कापून उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

महिला आणि चाकरमान्यांसाठी उत्तम पर्याय या कार्यक्रमास विशेष उपस्थित राहिलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका रेश्माताई भुजबळ म्हणाल्या, “पिंपरी-चिंचवड परिसराचा वेगाने विस्तार होत असताना पुनावळे भागात अशा दर्जेदार ई-टू-व्हीलर शोरूमची अत्यंत गरज होती. महिला, विद्यार्थी आणि चाकरमान्यांसाठी सुरक्षित व किफायतशीर प्रवासाचा एक उत्तम पर्याय या सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.”

दर्जेदार सेवा आणि तंत्रज्ञान एकाच छताखाली ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा संकल्प व्यक्त करत ‘NIA EV Motors’ चे व्यवस्थापकीय संचालक आलोक शेठ म्हणाले, “आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम बॅटरी रेंज आणि स्टायलिश लुक असलेल्या सर्वोत्तम इलेक्ट्रिक दुचाकी ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे. केवळ विक्रीपुरते मर्यादित न राहता, दर्जेदार सर्व्हिस (After-sales Service) आणि सुट्या भागांची उपलब्धता देऊन ग्राहकांचा विश्वास जिंकण्यास आमचे प्राधान्य असेल.”

उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी शोरूममधील विविध अत्याधुनिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची पाहणी केली. या कार्यक्रमास स्थानिक नागरिक, व्यावसायिक, दुचाकीप्रेमी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.