Latest News

कॉर्पोरेट जगतात ‘एक्सपिरियन्स डिझाइन’ची क्रांती; केवळ भिंती नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या अनुभवाला प्राधान्य

Share Post

भारतातील कार्यस्थळे आणि व्यावसायिक आस्थापनांचे स्वरूप आता केवळ भौतिक संरचनेपुरते मर्यादित न राहता ‘एक्सपिरियन्स डिझाइन’कडे वेगाने बदलत असून, संस्थेची संस्कृती आणि कर्मचाऱ्यांचा भावनिक अनुभव हा कॉर्पोरेट विश्वाचा मुख्य गाभा बनत आहे. ‘सीबीआरई’च्या २०२६ मधील पाहणीनुसार ६५ टक्के कंपन्यांनी कार्यस्थळाचा अनुभव सुधारण्यासाठी ब्रँड आणि संस्कृतीवर आधारित डिझाइनला प्रथम प्राधान्य दिले आहे. या बदलत्या प्रवासात मोलाचे योगदान देणाऱ्या ‘हॅपी स्पेसेस इंडिया’ (Happy Spaces India) या अग्रगण्य एक्सपिरियन्स डिझाइन स्टुडिओने या क्षेत्रात आपल्या यशस्वी वाटचालीची १० वर्षे पूर्ण केली आहेत.कॉर्पोरेट जगतात ‘एक्सपिरियन्स डिझाइन’ची क्रांती; केवळ भिंती नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या अनुभवाला प्राधान्य

ग्राहकांना केवळ वस्तू किंवा सेवा नव्हे, तर तिथे मिळणारा एकूण अनुभव हवा असतो, ही संकल्पना ‘स्टारबक्स’, ‘पीव्हीआर आयनॉक्स’, ‘बस्टियन’ आणि ‘मिराज सिनेमा’ यांसारख्या हॉस्पिटॅलिटी व मनोरंजन क्षेत्रातील आस्थापनांमध्ये प्रकर्षाने दिसून येते. आता हाच दृष्टिकोन कॉर्पोरेट कार्यालयांमध्येही लागू होत असून, नव्या पिढीतील कर्मचाऱ्यांना साध्या क्युबिकल्सऐवजी उत्साही वातावरण, कॅफे-शैलीतील मोकळ्या जागा आणि सर्जनशीलतेला चालना देणारी रचना हवी आहे. एक्सपिरियन्स डिझाइनच्या मागे मानसोपचारशास्त्र (Psychology), वर्तणूक शास्त्र (Behavioural Science) आणि मानवी संज्ञान (Human Cognition) यांचा सखोल अभ्यास असतो; ज्यामध्ये प्रकाश, रंग, ध्वनी आणि नैसर्गिक घटकांच्या साहाय्याने मानवी भावना आणि एकाग्रतेवर सकारात्मक परिणाम साधला जातो.

या नाविन्यपूर्ण क्षेत्रात २०१६ मध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर गणेश गडाख यांनी पल्लवी गडाख आणि अभय कुर्डुकर यांच्या सहकार्याने ‘हॅपी स्पेसेस इंडिया’ या ‘पॅशन प्रोजेक्ट’ची स्थापना केली होती, ज्याचे रूपांतर आज एका यशस्वी व्यवसायात झाले आहे. एका छोट्या जर्मन कंपनीच्या कार्यालयापासून सुरू झालेला हा प्रवास आज मुंबईतील क्रिसिल हाऊस, ॲम्बिट हाऊस, डी बीअर्स मुख्यालय, झायडस, दिल्लीतील रोल्स-रॉयस, पुणे व बेंगळुरूमधील एसकेएफ कार्यालये आणि कोलकात्यातील २८ मजली बंधन बँकेची इमारत यांसारख्या भव्य प्रकल्पांपर्यंत पोहोचला आहे. तसेच टाटा आणि गोदरेज यांच्या कारखान्यांमध्ये व विविध कार्यालयांमध्येही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

आजवर १६ हून अधिक शहरांमध्ये ७५ हून अधिक ठिकाणी तब्बल २५ लाख चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रावर हॅपी स्पेसेस इंडियाने एक्सपिरियन्स डिझाइन साकारले असून, रिटेल व हॉटेल्सच्या ब्रँडिंगसह सार्वजनिक ठिकाणांच्या नूतनीकरणातही योगदान दिले आहे. “एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या जगात माणसांना जिवंत आणि आनंद देणाऱ्या अनुभवांची ओढ अधिक वाढणार असून, भविष्यातील जागा केवळ कामासाठी नसून माणसांना जोडण्यासाठी व आनंद देण्यासाठी असतील,” असा दृष्टिकोन हॅपी स्पेसेस इंडियाचे संस्थापक गणेश गडाख यांनी व्यक्त केला आहे.

कॉर्पोरेट जगतात 'एक्सपिरियन्स डिझाइन'ची क्रांती; केवळ भिंती नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या अनुभवाला प्राधान्य
कॉर्पोरेट जगतात ‘एक्सपिरियन्स डिझाइन’ची क्रांती; केवळ भिंती नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या अनुभवाला प्राधान्य