
KOCCA On Screen: कोरियन आशयामुळे भारतीय OTT बाजारात संधी
KOCCA On Screen: के-ड्रामा आणि वैरायटी शोजमुळे भारतातील ६५० मिलियन ओटीटी बाजारपेठेत प्रवेशाला गती
दक्षिण कोरियाच्या संस्कृती, क्रीडा आणि पर्यटन मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या ‘कोरिया क्रिएटिव्ह कंटेंट एजन्सी’ (केओसीसीए) इंडियाने, २२-२३ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील ‘नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा’ (एनएमआयसी) येथे ‘KOCCA On Screen’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम कोरियन प्रसारण आशयासाठी एक प्रमुख बीटुबी (B2B) निर्यात-समर्थन उपक्रम असून, यासाठी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (एनएफडीसी) चे सहकार्य लाभले होते.
KOCCA On Screen उपक्रमाचे स्वरूप आणि चर्चा
या कार्यक्रमाद्वारे भारतीय उद्योगातील व्यावसायिकांना कोरियन नाटके, मनोरंजन कार्यक्रम आणि आशयाचे नवनवीन प्रकार यांची ओळख करून देण्यात आली. तसेच, कोरियन आशय निर्मिती आणि प्रेक्षकांच्या कलानुसार असलेल्या ट्रेंड्सबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
दोन दिवस चाललेल्या या उपक्रमातील मुख्य वैशिष्ट्ये:
- ‘स्पॉटलाइट ऑन के-आयपी’: कोरियन आशयासाठी आयपी पिचिंग सत्रे.
- व्यावसायिक बैठका: १५ नियोजित ‘वन-टू-वन’ व्यावसायिक बैठकांचे आयोजन.
- महत्त्वाच्या संधींवर चर्चा: परवाना (Licensing), रिमेक अधिकार, फॉरमॅट विक्री, वितरण आणि सह-निर्मिती (Co-production) यांसारख्या विषयांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
KOCCA On Screen द्वारे भारतीय बाजारपेठेवर लक्ष
जागतिक स्तरावर कोरियन मनोरंजनाची वाढती मागणी पाहता, १.४७ अब्ज लोकसंख्या असलेल्या आणि ६५० मिलियन ओटीटी वापरकर्त्यांचा वेगाने विस्तार होत असलेल्या भारतीय बाजारपेठेवर या उपक्रमाद्वारे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
केवळ वैयक्तिक किंवा एकवेळच्या व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, KOCCA On Screen ने दक्षिण कोरिया आणि भारत यांच्यात दीर्घकालीन व शाश्वत व्यावसायिक भागीदारी घडवून आणण्यासाठी एक पद्धतशीर आणि करार-केंद्रित बीटुबी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. दोन्ही देशांमधील संस्थात्मक विश्वास दृढ करणे, बाजारपेठेत प्रवेशासाठीचे अडथळे कमी करणे आणि द्विपक्षीय माध्यम सहकार्य अधिक सखोल करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते.
KOCCA On Screen बाबत अधिकृत वक्तव्ये
कार्यक्रमाच्या यशोगाथेवर भाष्य करताना कोक्का इंडियाचे संचालक यंग सू किम म्हणाले:
“भारत ही एक अत्यंत महत्त्वाची धोरणात्मक बाजारपेठ आहे. या देशात कोरियन आशयाची मागणी वेगाने वाढत आहे. भारतातील सरकारी यंत्रणांसोबत आमच्या प्रबळ सहयोगात्मक आराखड्याच्या आधारे आम्ही खरेदीदारांशी जोडणी करण्यापासून ते इव्हेण्टनंतर वाटाघाटींपर्यंत सातत्यपूर्ण, टप्प्याटप्प्याने पाठबळ देऊन कोक्का ऑन स्क्रीनचे रूपांतर प्रत्यक्ष करार आणि वितरण करारांमध्ये व्हावे यासाठी कटिबद्ध आहोत.”
एनएमआयसी-एनएफडीसीचे डेप्युटी जनरल मॅनेजर सत्यजित मांडले म्हणाले:
“कोक्का ने एनएमआयसी-एनएफडीसीसोबत सहयोगाने एवीजीसी आणि चित्रपट क्षेत्रातील भारतीय व कोरियन कंपन्यांमध्ये सह-निर्मितीच्या (को-प्रॉडक्शन) संधींना चालना देण्यासाठी उत्कृष्ट पुढाकार घेतला आहे. दोन्ही देशांमधील सर्जनशील सहयोग अधिक दृढ करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आपल्या माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार आम्ही ‘ऑरेंज इकॉनॉमी’ अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि भविष्यात असे अनेक आंतरराष्ट्रीय सहयोग सातत्याने घडवून आणू. आम्हाला खात्री आहे की, या इव्हेण्टचे पुढील एडिशन याहूनही अधिक व्यापक आणि भव्य असेल.”
KOCCA On Screen मध्ये आघाडीच्या कंपन्यांचा सहभाग
भारतातील ओटीटी, ब्रॉडकास्टिंग, प्रोडक्शन आणि डिस्ट्रिब्युशन क्षेत्रामधील २० हून अधिक आघाडीच्या कंपन्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला:
- प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म्स: जिओस्टार (JioStar), अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video), आणि झी५ (ZEE5).
- ब्रॉडकास्टर्स व डिस्ट्रिब्युटर्स: झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस, ईनाडू टेलिव्हिजन प्रा. लि., आणि शेमारू एंटरटेनमेंट.
- नामांकित प्रोडक्शन हाऊसेस: टी-सिरीज, बनिजय एशिया, आणि अलायन्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.

